सावधान! मोबाईल फोनच्या कव्हरच्या पाठीमागे ५०, १००, किंवा ५०० रुपयांची नोट ठेवता का ? जाणून घ्या याचे परिणाम…

सावधान! मोबाईल फोनच्या कव्हरच्या पाठीमागे ५०, १००, किंवा ५०० रुपयांची नोट ठेवता का जाणून घ्या याचे परिणाम

भारतामध्ये अनेकांच्या मोबाईल फोनच्या कव्हर मध्ये दहा ,पन्नास रुपयांपासून ते पाचशे रुपयांची नोट ठेवलेली दिसून येते.  फोनच्या कव्हर मध्ये ठेवलेले हे पैसे ऐनवेळी आणीबाणीच्या प्रसंगी मदतीला येतील असे अनेक जणांना वाटते.  मात्र अशा प्रकारे नोटा ठेवणे हे धोकादायक ठरू शकते ही बाब आता लक्षात घ्यावी एका चुकीमुळे एखाद्याला आपल्या जीवास देखील मुकावे लागू शकते.

फोन गरम झाल्यानंतर

जेव्हा तुम्ही मोबाईल फोनचा जास्त वापर करतात त्यावेळी हॅण्डसेट अधिक गरम होतो . फोन गरम होताच फोनची मागील बाजू जळू लागते अशा परिस्थितीमध्येच तुम्ही जर तुमच्या फोनच्या कव्हर च्या मागे एक नोट ठेवलेली असेल तर फोन मधील उष्णतेचा मार्ग बंद होतो व यामुळे तुमच्या फोनचा स्फोट देखील होऊ शकतो.  यामुळे मोबाईल फोन मध्ये घट्ट कव्हर वापरू नये , असे तज्ञांचे म्हणणे आहे.  फोन मधील उष्णता जर बाहेर पडली नाही तर फोनचा स्फोट  देखील होऊ शकतो.

नोटांवरील केमिकल ही घातक

नोटा कागदापासून बनलेल्या असल्या तरी त्यात अनेक प्रकारचे रासायनिक वापरली जातात.  जेव्हा फोन गरम होतो आणि नोटेमुळे उष्णता सोडली जात नाही . तेव्हा त्याला आग लागू शकते.  तसेच नोटे मध्ये असलेल्या केमिकल मुळे ही आग आणखीन वाढू शकते.  त्यामुळे चुकूनही मोबाईल फोन मध्ये नोट ठेवू नका मोबाईल फोनचे कव्हर देखील अतिशय काळजीपूर्वक लावा कवर जर घट्ट असेल तर मोबाईल फोन ब्लास्ट होऊ शकतो.

त्याशिवाय नेहमी एक लक्षात ठेवा की जर मोबाईल फोनचे कव्हर मध्ये नोट ठेवली असेल तर फोन चार्जिंगला असताना वापरू नका मोबाईल फोन चार्जिंगला असताना वापर करणे व त्यावर बोलणे हे धोकादायक आहे.

मोबाईलचे अतिवापरामुळे शरीरावरील दुष्परिणाम

मोबाईलच्या अतिवापरामुळे डोकेदुखी , टेन्शन निद्रानाश आणि कानाच्या पडद्यावर वाईट परिणाम अशा गोष्टी खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले आहेत.  मुलं अभ्यास करताना सुद्धा मोबाईलवर गेम खेळत असतात . आणि इंटरनेट वापरतात याचाच परिणाम एकाग्रतेवर आणि अभ्यास करताना होतो.  त्याशिवाय मोबाईलचा वापर करताना रेडिएशन निघतात त्याचाच परिणाम शरीरावर होत असल्याचे म्हटले जाते. 

Leave a Reply