गौरी गणपती सणामध्ये दिवाळीप्रमाणे आनंदाचा शिजा वाटण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे मंत्रिमंडळाची काल बैठक पार पडली या बैठकीमध्ये हा महत्त्व चा निर्णय घेण्यात आला आहे त्याप्रमाणे शिधा धारकांना शंभर रुपयात एक किलो चणा डाळ एक किलो रवा एक किलो साखर आणि एक लिटर पाम तेल देण्यात येणार आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या पार पडलेल्या बैठकीत आणखीही काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे महाराष्ट्र करण्यात आला आहे आदिवासी समाजासाठी बिरसा मुंडा या नवीन योजनेला मिळाली आहे.
मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय
राज्यातील 17 जिल्ह्यांतील सर्व आदिवासी वाडे, पाडे आता मुख्य रस्त्याने जोडणार. भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना राबवणार आहे. पाच हजार कोटीचा प्रस्ताव (आदिवासी विकास विभाग)
गौरी गणपती, दिवाळीसाठी 100 रुपयात आनंदाचा शिधा प्रत्येकी एक किलोचा रवा, चणाडाळ, साखर, खाद्यतेल असा शिधा (अन्न व नागरी पुरवठा)
आयटीआयमधील शिल्प कारागीर प्रशिक्षणार्थीना विद्यावेतनात भरीव वाढ. आता दरमहा 500 रुपये मिळणार (कौशल्य विकास )
(महसूल विभाग)फोर्ट येथे मुंबई प्रेस क्लबला पुनर्विकासासाठी परवानगी
महाराष्ट्र कॅसिनो कायदा रद्द (गृह विभाग )
केंद्राच्या सूचनांप्रमाणे राज्यात पोषण अभियान कार्यक्रम, राज्याचा हिस्सा वाढला (महिला व बाल विकास)
सहकारी संस्था आणि सभासदांबाबतचा 2023 चा अध्यादेश मागे (सहकार विभाग )
दुय्यम न्यायालयातील निवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित निवृत्तीवेतन
(विधी व न्याय विभाग )
दिवाणी न्यायालय (विधी व न्याय विभाग)मंडणगड येथे
एक किलो रवा, एक किलो चनाडाळ फक्त शंभर रुपयांमध्ये..
लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी आता थोडेच दिवस उरले आहेत गृहिणींना गौरी गणपती साठी फराळ बनवण्यासाठी वेध लागले आहेत त्यामुळे स्वस्त धान्य दुकानांमध्ये शंभर रुपयात आनंदाचा शिधा मिळणार आहे फक्त शंभर रुपयांमध्ये एक किलो रवा एक किलो चणाडाळ एक किलो साखर व एक किलो तेल देण्यात येणार आहे असे राज्य सरकारने जाहीर केले सरकारने वेळेवर एकत्रितपणे उपलब्ध करून द्यावा. जेणेकरून लाभार्थी, दुकानदारांची गैरसोय होणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर दुकानांमध्ये शिधा उपलब्ध करून द्यावे अशी मागणी दुकानदारांकडून करण्यात येत आहे.