ड्रॅगन फ्रुट लागवड अनुदान योजना, लागवड पद्धत, अर्ज प्रक्रिया, संपूर्ण माहिती..

ड्रॅगaन फ्रुट लागवड अनुदान योजना ,लागवड पद्धत, अर्ज प्रक्रिया, संपूर्ण माहिती..

ड्रॅगन फ्रुट हे निवडुंग परिवारातील एक फळपिक असून यांच्यातील अनेक पोषकत्वामुळे या फळाला सुपर फ्रुट म्हणून देखील ओळखले जाते.  महत्त्वाचे म्हणजे या फळाला पाणीदेखील कमी असले तरी चालते हे फ्रूट उत्तम तग धरून राहते.  दुसरी बाब म्हणजे या पिकावर कीड व रोगाचा प्रादुर्भाव अत्यंत कमी प्रमाणात होत असतो, म्हणून पीक संरक्षणाकरिता होणारा खर्च देखील वाचतो.  त्यामुळे महत्त्वाच्या अशा या फळ पिकाकरिता शासनाच्या एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत या पिकाच्या लागवडीकरिता प्रोत्साहन देण्यात येते.

कुणाला मिळते अनुदान

ज्या शेतकऱ्यांकडे स्वतःच्या मालकीची कमीत कमी 0.20 हेक्टर जमीन आहे. अशा सर्व शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ मिळतो.

अशा पद्धतीने आहे अनुदानाचे स्वरूप

या योजनेअंतर्गत ड्रॅगन फ्रुट लागवडीचा एकूण खर्चाच्या 40% किंवा जास्तीत जास्त 1  लाख 60 हजार रुपये इतक्या अनुदान एक हेक्टर करिता मिळते.  हे अनुदान मंडळ कृषी अधिकाऱ्यांच्या मार्फत तपासणी केल्यानंतर तीन टप्प्यांमध्ये दिले जाते हे तीन टप्पे म्हणजे पहिल्या वर्षी 60 टक्के दुसऱ्या वर्षी 20% व तिसऱ्या वर्षी 20 टक्के अशा पद्धतीने अनुदान देण्यात येते. सगळ्यात महत्त्वाची म्हणजे अनुदान मिळण्याकरिता दुसऱ्या वर्षी कमीत कमी 75 टक्के आणि तिसऱ्या वर्षी कमीत कमी 90 टक्के झाडे जिवंत ठेवणे आवश्यक आहे.

कोणकोणत्या कामांकरिता दिले जाते अनुदान

यामध्ये ड्रॅगन फ्रुट लागवडीकरिता आवश्यक असलेले खड्ड्यांची खोदाई, ड्रॅगन फ्रुट च्या झाडांच्या आधारा करिता आवश्यक असलेले सिमेंट काँक्रीट चे खांब उभारणे, खांबावर प्लेट लावणे तसेच रोपांची लागवड करणे, खतांचे व्यवस्थापन ठिबक सिंचन व पिक संरक्षणाकरिता आवश्यक बाबी याकरिता अनुदान देण्यात येते.

एका लाभार्थ्याला किती क्षेत्रापर्यंत करता येतो अर्ज? 

या योजनेअंतर्गत एका लाभार्थ्याला किमान 0.20 हेक्टर आणि जास्तीत जास्त चार हेक्टर मर्यादेपर्यंत ड्रॅगन फ्रुट ची लागवड या योजनेअंतर्गत करता येते व अनुदानाचा लाभ मिळवता येतो.

साधारणपणे अनुदानाची प्रक्रिया कशी असते

कृषी सहाय्यकाच्या माध्यमातून अर्ज केल्यानंतर लागवड स्थळाची पाहणी केली जाते . त्यानंतर कृषी अधिकाऱ्यांनी पूर्व समिती दिल्यास एक महिन्याच्या आत लागवड सुरू करणे गरजेचे असते.  तसेच लागवड सलग क्षेत्रावर करणे बंधनकारक असून लागवडीकरिता 0.60× 0.60× 0.60 मीटर आकाराचे खड्डे खोदणे आवश्यक आहे.  व लागवडीकरिता सिंचन करणे बंधनकारक आहे . लागवडी साडेचार बाय तीन मीटर किंवा साडेतीन बाय तीन मीटर किंवा तीन बाय तीन मीटर अंतरावर करणे आवश्यक आहे.

जर तुम्ही साडेचार बाय तीन मीटर अंतरावर लागवड केली तर एका हेक्टर मध्ये 2960 रुपये , साडेतीन बाय तीन मीटर अंतरावर केल्यास हेक्टरी तीन हजार 808 रुपये आणि तीन बाय तीन मीटर अंतरावर केल्यास 4444 रोपांची लागवड करता येते.

ड्रॅगन फ्रुट लागवडीकरिता आवश्यक रोपांची खरेदी ही कृषी विभागाच्या रोपवाटिका किंवा कृषी विद्यापीठाची रोपवाटिका,  भारतीय कृषी अनु संधान संस्था, कृषी विज्ञान केंद्र च्या रोपवाटिका आणि मनरेगा अंतर्गत असलेल्या ग्रामपंचायतीच्या रोपवाटिकाच्या माध्यमातून रोपांची खरेदी करणे गरजेचे आहे.

आवश्यक असलेली कागदपत्रे

या योजनेअंतर्गत अनुदाना करिता अर्ज करण्यासाठी सातबारा उतारा जर संयुक्त सातबारा असेल तर प्रत्येक खातेदाराचे संमती पत्र, आधार कार्ड लिंक असलेल्या राष्ट्रीयकृत बँक पासबुक च्या पहिल्या पानाची झेरॉक्स, आधार कार्ड तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी जातीचा दाखला व विहित नमुन्यातील हमीपत्र आवश्यक असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *