कृषीसेवक पदासाठी भरल्या जाणार तब्बल ९५२ जागा, अर्जाची अंतिम मुदत ?तुमच्या विभागात जागा किती?

कृषीसेवक पदासाठी भरल्या जाणार तब्बल ९५२ जागा, अर्जाची अंतिम मुदत ?तुमच्या विभागात जागा किती?

राज्यात कृषी सेवक पदासाठी भरती करण्यात येणार आहे.  राज्यातील 952 जागा भरण्याच्या सूचना कृषी विभागाने विभागीय कृषी कार्यालयाला दिल्या आहेत.विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातील कृषी सेवक पदासाठी भरती केली जात आहे. 

त्यासाठी छत्रपती संभाजी नगर, कोल्हापूर ,नाशिक, अमरावती ,नागपूर, पुणे, ठाणे या विभागांमध्ये भरती होणार आहे. 31 ऑगस्ट 2023 पर्यंत अर्जदारांना अर्ज करता येणार आहे त्यासाठी कृषी विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. 

कोणत्या जिल्ह्यात किती रिक्त पदे?

औरंगाबाद- १९६
ठाणे -२४७
अमरावती- १५६
लातूर-१७०
नाशिक- ३३६
नागपूर- ३६५
पुणे- १८२
कोल्हापूर-२५०

किती मिळणार वेतन

प्रति महिना 16 हजार रुपये कृषी विभागातील कृषी सेवकांच्या पदासाठी निश्चित वेतन जाहीर करण्यात आले आहे.

शैक्षणिक अनुभव व पात्रता.

पात्र अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कृषी विषयांमधील पदविका व पदवी असणे आवश्यक.

प्रथम एक वर्षासाठी निवड झालेल्या उमेदवाराची कृषी सेवक पदी नियुक्ती करण्यात येईल. काम समाधानकारक असेल तर पुढील दोन वर्षासाठी पुनर्नियुक्ती करण्यात येणार असून कृषी सेवक पदी नियुक्तीचा प्रत्यक्ष कामाचा कालावधी तीन वर्षाचा असेल.

कसा व कुठे कराल अर्ज

पात्र उमेदवारांना कृषी सेवक पदासाठी कृषी विभागाच्या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे . अधिक माहितीसाठी भेट द्या -https://krishi.maharashtra.gov.in/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *