Maharashtra Weather Update: राज्यात रविवार व सोमवारी दि. १५ व १६ डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात पहाटे ५ चे किमान तापमानं हे बऱ्याच ठिकाणी एक अंकी संख्येवर आले आहे. याशिवाय तापमाने सरासरीपेक्षा २ ते ६ डिग्रीपर्यंत खालावून जळगांव अहिल्यानगर, छ. सं. नगर, बुलढाणा, धाराशिव, परभणी, नांदेड अकोला, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, वर्धा या सर्व जिल्ह्यात ह्या दोन दिवसात थंडीची लाट व काही जिल्ह्यात थंडीची लाटसदृश्य स्थितीची शक्यता जाणवते, असा अंदाज हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलेल्या अंदाजानुसार सध्या जाणवत असलेली अपेक्षित थंडी बुधवार दि. १८ डिसेंबर(संकष्टी चतुर्थी)पर्यन्त टिकून राहण्याची शक्यता कायम आहे.
दरम्यान खान्देशांतील नंदुरबार, धुळे, जळगांव या तीन जिल्ह्यात काही ठिकाणी सरासरी असलेल्या साधारण दवांक बिंदू तापमान व वाढलेल्या आर्द्रतेमुळे अति खालावलेल्या किमान तापमानातून, भू-स्फटिकीकरण होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे.












