शेतकऱ्यांनो ‘ई-पीक नोंदणी’ करायला चुकाल तर या योजनांसाठी मुकाल, अशी करा नोंदणी…

शेतकऱ्यांनो 'ई-पीक नोंदणी' करायला चुकाल तर या योजनांसाठी मुकाल, अशी करा नोंदणी

शेतकऱ्यांना खरीप ,रब्बी तसेच उन्हाळ पिकांची नोंदणी ॲपच्या माध्यमातून करता येते.  जमीन पडीक आहे की लागवडीखालील आहे, तसेच त्याच्यामध्ये कोणते पीक, किती क्षेत्रात घेतले जाते. विविध प्रकारची माहिती शासनाला व्हावी यासाठी महसूल विभागातर्फे ही ई पिक पाहणी निर्मिती करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामातील पिकांची नोंदणी ॲपच्या माध्यमातून करता येते.

त्यानुसार यंदाच्या खरीप हंगामातील पिकांच्या नोंदणीसाठी एक जुलैपासून ई – पीक पाहणी सुरू करण्यात आली आहे. महसूल विभागातर्फे ई – पीक पाहणी प्रकल्प 15 ऑगस्ट 2021 पासून सुरु करण्यात आला होता .त्यानुसार शेतकरी जर पीक घेत असतील तर दरवर्षी रब्बी आणि उन्हाळी हंगामातील पिकांची नोंदणी मोबाईल ॲपच्या माध्यमातून  जर केली नाही ,तर नवीन हंगामातील सातबारा हा उपलब्ध होणार नाही .पिक विमा योजनेचा लाभ मिळत नाही. रेकॉर्डवर शेती पडीक दिसते. हमीभाव केंद्रवर विक्री करता येत नाही. पीक कर्ज ,शासनाकडून मिळणारी मदत प्रोत्साहन तसेच जमिनीवर कृषी व महसूल विषयक योजनांचा लाभ देखील घेण्यात अडचणी निर्माण होतात. या सर्व लाभांसाठी ही पीक पाहणी करणे आवश्यक आहे.

पुन्हा आला नवीन व्हर्जन

ईपीक पाहणी करण्यासाठी ईपीक पाहणी शेतकऱ्यांना आपल्या मोबाईल मध्ये अँप डाऊनलोड करावे लागते .परंतु यंदा 2.0.11 हा नवीन व्हर्जन इन्स्टॉल करावा लागेल .हे व्हर्जन गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध केले आहे. जुन्या व्हर्जन चे ॲप क्रियाशील ठरणार नाही.

ई पिक पाहणी मोबाईल ॲप्लिकेशन चा वापर कसा करावा

सर्वप्रथम अँड्रॉइड मोबाईल मधील प्ले स्टोअर मधून https://play.google.com/store/apps/details?id=org.mahait.epeek  हे ई पीक पाहणी ॲप्लीकेशन डाऊनलोड करुन घ्यावे.

त्यानंतर शेतकऱ्यांनी स्वतःचा मोबाईल नंबर ची नोंदणी करून घ्यावी.

प्रथम, तुम्ही जिथे राहता ते ठिकाण निवडणे आवश्यक आहे, जसे की तुमचा परिसर, शहर किंवा गाव. त्यानंतर, तुम्ही खातेदार निवडा किंवा गट निवडू शकता.

ही माहिती टाकणे पूर्ण केल्यानंतर, आपले प्रोफाइल निवडा आणि नंतर मुख्य पृष्ठावर परत जा.

होम पेजवर आल्यानंतर पिकाची माहिती भरावी पिकाची अचूक माहिती भरल्यानंतर खाते नंबर निवडावा. क्रमांक निवडल्यानंतर जमिनीचे एकूण क्षेत्र निवडा ,पुढे हंगाम निवडा, त्यानंतर पिकाचा वर्ग पीक, असेल तर एक पीक निवडा किंवा एका पेक्षा जास्त असेल तर बहु पिक निवडा.

हे झाल्यानंतर पिकांचे नाव निवडून ,सिंचन पद्धत लागवडीचे दिनांक या गोष्टी अचूकपणे भरल्यानंतर स्वतःच्या मोबाईलचे जीपीएस लोकेशन, चालू शेतात उभे राहून मुख्य पिकाचे फोटो काढावेत,काही महत्त्वाची प्रक्रिया असल्यामुळे मुख्य पिकाचे फोटो काढताना शेतकऱ्यांनी खूप काळजी घ्यावी लागते.

हे सर्व झाल्यानंतर माहिती जमा करावी ही पिक पाहणी इतक्या सोप्या पद्धतीने करता येते,

 ‘ई-पीक पाहणी अंतर्गत खातेदाराची एकदाच नोंदणी करता येईल. सप्टेंबर पर्यंत हंगाम निहाय पिकांची माहिती अक्षांश रेखांश काढलेल्या पिकांच्या फोटोसह अपलोड करता येईल . 16 ते 30 डिसेंबरच्या दरम्यान मोबाईल ॲप मधील माहितीची अचूकता व आवश्यक असल्यास दुरुस्ती तलाठी द्वारे कायम केली जाते. खातीनिहाय पिकांची माहिती डिजिटल स्वाक्षरी सातबारा मधील उपलब्ध करून देण्यात येईल.

रब्बी हंगामाची पीक पाहणी शेतकरी ऑक्टोंबर पासून अपलोड करू शकतात. एका मोबाईल वरून 20 खातेदारांची नोंदणी करता येणार असल्याने, एखाद्या शेतकऱ्याकडे जर स्मार्टफोन नसेल तर तो दुसऱ्याच्या स्मार्टफोनवरून ई पिक पाहणी करू शकतो.

Leave a Reply