राज्यात सर्वदूर पावसाची हजेरी , कोवळ्या पिकांना जीवदान; खरिपाच्या पेरण्यांना वेग येणार…

राज्यात सर्वदूर पावसाची हजेरी , कोवळ्या पिकांना जीवदान; खरिपाच्या पेरण्यांना वेग येणार... (2)

यंदा पावसाळा लांबला, यातच पूर्व मौसमी पावसाने ही पुरेशी हजेरी लावली नाही. मान्सून दाखल झाल्यानंतरही पूर्व कोकण वगळता अनेक भागात पेरणी योग्य पाऊस झाला नाही. मात्र पावसा अभावी चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना बुधवारी काहीसा दिलासा मिळाला आहे. राज्यात सर्व दूर झालेल्या पावसाने कवळ्या पिकांना दिलासा मिळालेला आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पेरणीला काहीसा वेग मिळाला आहे.

गुरुवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये राज्यात सर्व दूर पावसाने हजेरी लावली आहे .कोकणा सह मराठवाड्यात पावसाचा जोर जास्त होता .तसेच मध्य महाराष्ट्रात विदर्भात हलक्या ते मध्यम पाऊस होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून नदी नाले भरून वाहत आहेत. सतत पडणाऱ्या पावसामुळे पूरस्थितीची शक्यता आहे.

जिल्ह्यातील गड नदी, जाणवली, कर्ली, तिलारी ,शुकनदी,  या नद्यांच्या पाणीपातळीत  मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे .रत्नागिरी, पालघर, जिल्ह्यातही जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.

अकोला जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने  दिलासादायक हजेरी लावली आहे .यामुळे खोळंबलेल्या पेरण्यांना वेग येणार आहे. अकोला जिल्ह्यात बार्शी, टाकळी, मूर्तीजापुर, पातुर ,इत्यादी तालुक्यात पावसाच्या सरी पडल्या. वाशिम जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली आहे. बुलढाणा जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पाऊस झाल्यामुळे दिलासा मिळाला आहे.

परभणी व हिंगोली जिल्ह्यातील पावसाचा जोर कायम राहिला. गुरुवारी सकाळपर्यंत हलका तो जोरदार पाऊस पडला. दोन्ही जिल्ह्यात काही भागात अतिवृष्टी झाली नांदेड जिल्ह्यात दोन दिवस पावसाने दमदार हजेरी लावली. माहूर, हिमायतनगर तालुके वगळता उर्वरित सर्व तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने खरीप पिकातील पेरण्याला वेग आला आहे.

खानदेशात सकाळी व रात्री अनेक भागात जोरदार व मध्यम पाऊस झाला असून, काही भागात तुरळक पाऊस झाला आहे .या पावसामुळे पेरणी झालेल्या क्षेत्रातील कवळे कोमांना दिलासा मिळाला आहे. जळगाव जिल्ह्यामधील यावल, जामनेर ,चोपडा, धुळ्यातील, शिरपूर साखरी, या भागात जोरदार पाऊस झाला.

पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर काही प्रमाणात कमी झाला आहे .मात्र पूर्व भागातील शिरूर, इंदापूर ,दौंड ,बारामती, सासवड, भागात, पावसाने हजेरी लावली आहे. पाऊस झालेल्या भागात शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून ,काही ठिकाणी पेरणीला सुरुवात केली आहे .मात्र अनेक ठिकाणी पावसाचा जोर नसल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत . 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *