![](https://krishi24.com/wp-content/uploads/2023/11/जुने-दस्त-शोधण्यासाठी-‘ई-सर्च-२.१-प्रणाली-सुरू.webp)
नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागामार्फत जमीन सदनिका किंवा दुकाने यांच्या खरेदी विक्री व्यवहारातील गैरप्रकाराला आळा घालणे आणि जुने दस्त शोधण्यासाठी ‘ई-सर्च’ संगणक प्रणाली विकसित केली आहे. यामध्ये नोंदणी विभागाने सुधारणा करून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ‘ई-सर्च 2.1 ही प्रणाली आणली आहे. त्यामुळे ई सर्च मध्ये दस्तशोधणे आता अधिकच गतिमान झाले आहे.
नोंदणी व मुद्रांक विभाग नागरिकांना अधिकाधिक सुविधा ऑनलाईन पद्धतीने देण्यात अग्रेसर आहे. याचाच एक भाग म्हणून खरेदी विक्री व्यवहारांची जुनी दस्त ऑनलाईन पाहण्याची सुविधा नोंदणी व मुद्रांक विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे.
एकाच जागेची किंवा सदनिकांची विक्री अनेकांना विकण्याचे प्रकार उघडकीस आले आहे.यामध्ये आर्थिक फसवणूक होते. एक सदनिका अनेक बँकेत गहाण ठेवून त्याआधारे कर्ज घेतले चे प्रकारही घडतात. या पार्श्वभूमीवर जुने दस्त शोधण्यासाठी ई सर्च प्रणाली उपयोगी पडते.
मागील आठ वर्ष ‘ई-सर्च’ प्रणाली मध्ये बदल करण्यात आले नव्हते तसेच ‘ई-सर्च’मध्ये दस्त शोधण्यास वेळ लागतो लवकर डाऊनलोड होत नाही अशा तक्रारी वारंवार आल्यानंतर नोंदणी विभागाने ई सर्च प्रणालीमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला.
ई सर्च 2.1 मध्ये हे दस्त उपलब्ध..
सद्यस्थितीत ‘ई-सर्च २.१’ मध्ये 1985 ते 2002 पर्यंत आणि 2012 ते 2023 पर्यंतचे दस्त उपलब्ध आहेत. सध्या 2002 ते 2012 दरम्यानची दस्त उपलब्ध करून देण्याचे काम सुरू असून दोन महिन्यात हे दस्त ‘ई-सर्च २.१’ मध्ये उपलब्ध होतील.
आता शोधा दस्त.
विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन रेकॉर्ड आणि पेमेंट या सदराखाली ही सर्च पर्याय उपलब्ध आहे यामध्ये सुरुवातीस वर्ष जिल्हा तालुका गाव दत्तचा प्रकार आणि सर्वे नंबर सिटी सर्वे नंबर ही माहिती भरल्यानंतर ‘ई-सर्च’ मध्ये मिळकतीबाबत नोंदविण्यात आलेल्या व्यवहारांची यादी मिळणार आहे.