या फुलाच्या उत्पादनातून प्रयोगशील शेतकऱ्याने 20 गुंठ्यातच साधली आर्थिक प्रगती…

या फुलाच्या उत्पादनातून प्रयोगशील शेतकऱ्याने 20 गुंठ्यातच साधली आर्थिक प्रगती..

पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यातील यवत या ठिकाणच्या एका प्रयोगशील शेतकऱ्याने पारंपारिक गुलछडीच्या पिकातूनच चांगले उत्पन्न कमावले तसेच आर्थिक प्रगती देखील साधली धनंजय शिवरकर हे या शेतकऱ्याचे नाव आहे.

अलीकडे अनेक शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती सोडून आधुनिक पद्धतीने शेतीत अधिक उत्पन्न मिळवले विशेष म्हणजे जाणकार लोकांच्या सल्ल्यानुसार देखील आधुनिक शेती करणे योग्यच आहे. परंतु या शेतकऱ्याने पारंपरिक शेतीतून पारंपरिक पद्धतीने तसेच योग्य नियोजनाच्या जोरावर शेती फायदेशीर करून दाखवली.

20 गुंठ्यातच साधली आर्थिक प्रगती

पुणे जिल्ह्यामधील दौंड तालुक्यातील यवत मधील प्रयोगशील शेतकऱ्याने गुलछडीच्या पिकातून आर्थिक प्रगती साधली आहे तसेच फायदेशीर करून दाखवली. या शेतकऱ्याने आपली वडिलोपार्जित वीस गुंठे म्हणजेच अर्धा एकर शेतीतून गुलछडी लागवडीचा प्रयोग केला व तो यशस्वी देखील करून दाखवला. 

सध्या परिसरामध्ये गुलछडी फुलांमुळे धनंजय शिवरकर हे चर्चेचा विषय बनले आहे .गुलछडी लागवड करण्यापूर्वी त्यांनी जमिनीत शेणखत टाकले त्यानंतर नांगरणी रोटावेटर मारून जमीन तयार केली लागवडीसाठी साडेचार फुटांची सरी काढली व त्यानंतर गुलछडी ची लागवड करण्यात आली यासाठी ठिबक सिंचन करण्यात आले म्हणून कमी पाण्यामध्ये चांगले उत्पादन त्यांना मिळू लागले .

या ठिबक सिंचना मधून विद्राव्य खताचा आणि औषधाचा डोस देखील पिकांना देण्यात आला. यामुळे खते व औषधे हे पिकांना संतुलित प्रमाणात मिळाले व त्यामुळे पिकांची चांगली वाढ होण्यास मदत झाली या फुलांना पुणे येथील  मार्केट यार्ड मध्ये चांगला भाव मिळत असतो या तूनच2 चांगली कमाई देखील होत असते.

गुलछडीला ७० ते ७५ रुपये भाव

गुलछडीला अडीशे ते तीनशे रुपये पर्यंत रेकॉर्ड ब्रेक भाव प्राप्त झालेला आहे मात्र सध्या 70 ते 75 रुपये किलो या दराने गुलछडी चे फुले विकले जातात या शेतकऱ्याने वीस गुंठ्यामध्ये केलेल्या गुलछडीच्या पिकातून चांगले उत्पन्न मिळत आहे तसेच वीस वर्षापासून  धनंजय गवस्‍कर या फुलाची शेती  करत आहेत या पिकामुळेच त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक हातभार लागत आहे या शेतकऱ्याने पारंपरिक शेतीतूनच योग्य नियोजनाच्या बळावर कौतुकास्पद काम केले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *