सर्व सामान्यांसाठी आनंदाची बातमी, खाद्यतेल होणार स्वस्त , सरकारने घेतला मोठा निर्णय.

सर्व सामान्यांसाठी आनंदाची बातमी खाद्यतेल होणार स्वस्त , सरकारने घेतला मोठा निर्णय

देशातील सर्व सामान्य जनतेला एक आनंदाची बातमी मिळणार आहे .ती म्हणजे सरकारने रिफाइल सोयाबीन तेल आणि सूर्यफूल तेलावर आयत शुल्का मध्ये 17.5% वरून 12.5% केले आहे. या संदर्भामध्ये अर्थमंत्रालयाने गुरुवारी एक अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.

कच्च्या सूर्यफूल आणि सोयाबीन तेलाची भारत रिफाइंड ऐवजी आयात करत असतो. असे असतानाही सरकारने रिफाइंड सोयाबीन आणि सूर्यफूल तेलावर आयात शुल्क कमी केले आहे .या कपातीमुळे रिफाइंड खाद्य तेलावरील प्रभावी शुल्क 13.7% वर पोहोचले आहे सर्व कच्च्या खाद्य तेलावरील प्रभाविशुल्क5.5 आहे.

सुधारित आयात शुल्क ३१ मार्च २०२४ पर्यंत होणार आहे . या निर्णयामुळे देशांमध्ये खाद्यतेलाच्या किमती कमी होणार आहेत. सूर्यफूल आणि सोयाबीन तेलावरील किमती कमी केल्यामुळे सर्वसामान्य जनतेला फायदा होणार आहे.

भारतातील पाम तेलाची आयात मे महिन्यामध्ये 14.59 टक्क्याने कमी होऊन चार लाख 39 हजार 173 टनांवर आली आहे. याचवेळी कच्च्या सूर्यफूल तेलाची आयात मोठ्या प्रमाणात वाढली आहे देशाच्या एकूण  वनस्पती तेल आयातीत पामतेलाचा वाटा 59% आहे. मे मध्ये वाढ होऊन सूर्यफूल तेलाच्या आयात २.९५ लाख टनांवर गेली आहे.   मागच्या वर्षीच्या मे महिन्यामध्ये हे आयात एक लाख 18 हजार 2 होती .

भारत हा प्रामुख्याने इंडोनेशिया आणि मलेशियातून पामतेलाची आयात करत असतो .तसेच  अर्जेंटिनातून सोयाबीन तेल आणि युक्रेन आणि रशियातून सूर्यफूल तेलाची भारत आयात करत असतो .आगामी काळामध्ये २२.३ लाख टन खाद्य तेलाची  देशात आयात होईल ‘एसईए’चा अंदाज आहे. 

Leave a Reply