शेतकऱ्याचा नादच खुळा! वीज कनेक्शन मिळाले नाही म्हणून थेट कोंबडीच्याखता पासून केली वीजनिर्मिती,वाचा सविस्तर ..

शेतकऱ्याचा नादच खुळा! वीज कनेक्शन मिळाले नाही म्हणून थेट कोंबडीच्याखता पासून केली वीजनिर्मिती,वाचा सविस्तर ..

सध्या हरियाणातील झज्जर येथील एका कुटुंबाची मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. त्यांची चर्चा होण्याचे कारण देखील खास आहे. कारण या कुटुंबाला वीज कनेक्शन मिळाले नाही . म्हणून त्यांनी घरीच वीजनिर्मिती केली आहे, ज्यामुळे त्यांचे अनेकजण कौतुक करत आहेत.

या शेतकऱ्यांनी वीज कनेक्शन मिळाले नाही , म्हणून त्यांच्या कुटुंबियांनी  कोंबडीच्या खता पासून वीज निर्मिती केली आता हे कुटुंब ही वीज स्वतः वापरत आहे . तसेच ते इतरांना ही वीज विकून पैसे कमवत आहे . त्यांच्या घरातील आणि हॅचरी मधील सर्व कामे या विजेपासून होत आहेत.  तसेच ते आता कोंबडीच्या विष्टे (खता ) पासून 50 किलो वीज निर्मिती करत आहे. 

चिकन फार्म वरतीच अशी उपकरणे बसवण्यात आलेले आहेत.  जी 24 तास वीज निर्मिती करतात तसेच ही उपकरणे दुर्गंधी व घाण देखील दूर करतात . कोंबडीच्या खतापासून वीज निर्मिती करणारा शेतकरी झज्जरमधील सिलानी केशो गावात राहणारा आहे . यांनी वीज जोडणीसाठी महामंडळाकडे अनेक

हेलपाटे मारले मात्र त्यांना वीज कनेक्शन मिळू शकले नाही.  त्यामुळे त्रासलेल्या रामेहर यांनी स्वतःच घरी वीज निर्मिती करण्याचे ठरवले.  यासाठी त्यांनी कृषी विभागाच्या मदतीने 20000 कोंबड्यांची हॅचरी घरी बसवली.  सर्वात अगोदर त्यांनी कोंबड्यांच्या खतापासून गॅस बनवला आणि त्यांच्या घरच्या गरज भागवल्या मात्र आता त्यांनी कोंबडीच्या खतापासून असं काही केलं की त्यांचा अविष्कार पाहण्यासाठी देश-विदेशातील लोक येत आहेत. 

आधी गॅस नंतर बनवली वीज

भारतीय लष्करातील सुभेदार निवृत्त झालेल्या रामेहर यांनी कोंबडीच्या खतापासून वीज निर्मिती करण्यासाठी त्यांच्या कोंबडी फार्ममध्ये एक प्लॉट उभारला आहे.  यापूर्वी त्यांनी दोन टाक्यांमध्ये गॅस तयार केला . त्यानंतर 50% गॅस आणि पन्नास टक्के डिझेलने जनरेटर चालवले त्यामुळे तीस किलोवॅट वीज निर्माण होऊ लागली.  2011 मध्ये 160 घनमीटर टाकी बांधण्यात आली.  आणि त्यातून 50 किलो वॅट वीज निर्माण झाली आता 240 घनमीटर ची टाकी बनवण्यात आली आहे.  ज्यामुळे त्यांना कुठूनही वीज आणण्याची गरज भासत नाही. 

Leave a Reply