खते, किटकनाशके, बियाणे यांच्या तक्रारीसाठी जिल्हास्तरावर तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात येणार ,मोबाइल नंबर उपलब्ध…

कृषी विभागाकडून आतापासून खरीप हंगामाचे नियोजन करण्यात येत असून या हंगामामध्ये शेतकऱ्यांचे किटकनाशके, खते, कृषी निविष्ठा व बियाणे संबंधित तक्रारी करण्यासाठी बीड जिल्हास्तरावर तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात येणार आहे.९४०३३०८६०८ हा मोबाइल नंबर या कक्षासाठी उपलब्ध करुन दिला आहे.१ जून ते १५ ऑगस्ट या कालावधीमध्ये या कक्षाचे कामकाज चालणार आहे.

शेतकऱ्यांचे खरीप हंगामामध्ये खत विषयी – कीटकनाशकांविषयी खूप तक्रारी असतात. शेतकऱ्यांना वेळेवर तक्रारी दाखल करता याव्यात यासाठी कृषी विभागाकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून खते, जिल्हास्तरावर कृषी निविष्ठा, किटकनाशके, व बियाणे यांच्या तक्रारीसाठी तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांकडून ९४०३३०८६०८ या मोबाइल नंबर प्राप्त होणाऱ्या तक्रारींची नोंदवहीत नोंद करण्यात येणार आहे . जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक यांच्या निदर्शनास या तक्रारी आणून देण्यासाठी सहायक कर्मचाऱ्याची नियुक्त करण्यात येणार आहे

सकाळी ९.३० ते रात्री ७ यावेळेत तक्रार निवारण कक्ष हा सुरु राहणार आहे. जिल्हा गुण नियंत्रण व सहकारी यांच्याकडून याबाबतच प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे . तसेच तपशीलवार सूचना संबंधितांना देण्यात येणार आहे. बीड जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर यासंबंधीचा आदेश यांनी काढला आहे. सदरील कक्ष वेळीच कार्यान्वित करण्याचेही बाबासाहेब जेजुरकर यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *