Grape export : या देशातून द्राक्षाची मागणी वाढली, त्यामुळे राज्यातून द्राक्ष निर्यातीला गती आली आहे.

द्राक्षाची मागणी युरोपियन देशातून वाढली आहे. म्हणून द्राक्ष निर्यातीला राज्यातून गती आली आहे.  आतापर्यंत राज्यातून २३१० कंटेनरमधून ३० हजार ९९२ टन द्राक्षाची निर्यात झाली आहे. उद्योगातील जाणकारांनी युरोपियन देशामधून या वर्षी द्राक्षाची निर्यात वाढण्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे.

दरवर्षी राज्यातून द्राक्ष निर्यात वाढत असून , प्रामुख्याने द्राक्षाची निर्यात ही युरोपसह आखाती देशात होत असते . युरोपियन देशात जानेवारीमध्ये द्राक्ष निर्यात सुरु झाली मात्र निर्यातीला पाहिजे तशी गती आली नव्हती.जानेवारीमध्ये नेदरलँड ,हॉलंड स्वीडन,स्विझर्लंड, रोमानिया, नेदरलँड्स अँटिल्स, या देशामध्ये द्राक्ष निर्यात केली होती . त्यानंतर पोलंड आणि स्पेन या देशामध्ये द्राक्ष निर्यात होऊ लागले .

नेदरलँड देशात ३० हजार ६५१ टन द्राक्ष २ हजार ३८३ कंटेनरमधून आतापर्यत पोहोचली असून . नेदरलॅंडमधून युके , जर्मनीसह अन्य भागात द्राक्ष पाठवली जात असल्यामुळे या देशामध्ये सर्वात जास्त द्राक्षाची निर्यात झाली आहे.

मागील काही दिवसांपासून द्राक्ष पिकास पोषक वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे या द्राक्षाचा रंग आणि आकार वाढण्यास , तसेच द्राक्षाची गोडी वाढण्यास पोषक वातावरणाची मदत होत आहे. त्यामुळे द्राक्षाची मागणीतही वाढ होत आहे.

मागील पंधरा दिवसांपासून द्राक्ष निर्यातीला गती आली आहे. आत्ताची परस्थिती पाहता सुएझ कालव्यातून वाहतूक बंद आहे तरी , द्राक्ष निर्यात करण्यासाठी निर्यातदार पुढे येत आहेत . द्राक्षाची निर्यात एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत युरोपियन देशात होत असते .

द्राक्षाची निर्यात मागील वर्षी राज्यातून ९० हजार टन झाली होती. तर २०२१-२२ मध्ये युरोपियन देशात १ लाख टन द्राक्ष निर्यात झाली होती.या वर्षी द्राक्षाची निर्यात ३० हजार ९९२ टन झाली आहे. नाशिक द्राक्ष पट्ट्यात यंदा नैसर्गिक आपत्तीचे संकट ओढावले नाही त्यामुळे नाशिकमधून निर्यात वाढेल, असा अंदाज निर्यातदारांचा आहे.

राज्यातील निर्यात स्थिती (बुधवारअखेर (ता. २१)

देश…कंटेनर…टन

नेदरलँड…२३८३…३०६५१.५१०

स्विझर्लंड…८…१०२.३९०

रोमानिया…५…६४.८७०

पोलंड…२…३३.६९६

स्वीडन…५…६३.४४०

नेदरलँड्स अँटिल्स…२…२५.४८०

स्पेन…५…५०.९९०

एकूण..२३१०…३०९९२.३७६

युरोपियन देशातून मागणी वाढल्यामुळे द्राक्ष निर्यातीस गती आली आहे.द्राक्ष हंगाम अजून दीड महिना चालू आहे. सध्या द्राक्ष पिकाला पोषक वातावरण असल्यामुळे युरोपियन देशात द्राक्षाची मागणी वाढत आहे.मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी निर्यात वाढेल, असा अंदाज आहे.
– गोविंद हांडे, निर्यात सल्लागार, कृषी आयुक्तालय, पुणे

Leave a Reply