सध्याच्या काळामध्ये शेतकरी शेतामध्ये नवीन नवीन प्रयोग करताना दिसत आहेत. व त्यातून चांगले उत्पन्न सुद्धा काढत आहेत .आता अनेक शेतकरी पूर्वीसारखी पारंपारिक शेती करत नसून आधुनिक शेती करत आहेत .वाशिम जिल्ह्यातील घोटा येथील एका युवा शेतकऱ्यांनी एका एकरात चांगली गुलाबाची शेती फुलवली आहे.
त्याचबरोबर त्यातून चांगले उत्पन्न देखील मिळवले आहे. विठ्ठल तांदळे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. घोटा येथील विठ्ठल तांदळे या शेतकऱ्यांने कृषी विभागाचे मार्गदर्शन घेतले . त्यानंतर महात्मा गांधी ग्रामीण रोजगार योजनेचा लाभ घेऊन आपल्या शेतात त्यांनी गुलाबाची शेती फुलवलेली आहे.
गुलाबाच्या फुलाला कायमची मागणी असते त्यामुळॆ त्याच्या विक्रीतून त्यांना चांगले पैसे मिळत आहेत.त्यांची शेती पाहायला व त्यांच्याकडून मार्गदर्शन घेण्यासाठी अनेक शेतकरी त्यांच्याकडे येतात सध्याच्या या अनियमित पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे.
त्याचबरोबर पारंपरिक शेतीतून अधिक उत्पन्न देखील मिळत नाही विठ्ठल तांदळे यांनी कृषी अधिकारी अनिल जयताडे यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतून पुणे येथून गुलाबाची रोपे आणली. त्यांनी दोन वर्षांपूर्वी ही रोपे आणली होती. ती आता चांगली भरलेली आहे.
वाशिम आणि हिंगोली जिल्ह्यात गुलाबाला अधिक मागणी असते. गुलाबाची शेती करणं हे विठ्ठल तांदळे यांच्यासाठी नवीनच होतं त्यामुळे शेती फुलवणं त्यांच्यासाठी एकदम कठीण काम होतं .त्यांनी फुल शेतीत दुष्काळी पट्ट्यात यशस्वी शेतीचे चांगले प्रयोग केले आहेत.