सद्या राज्यात शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे . दरवर्षी प्रमाणे शेतकऱ्यांकडून डिएपी खताची जास्त मागणी आहे. डिएपी खता मध्ये १८ टक्के नत्र तर ४६ टक्के स्फुरद ही अन्नद्रव्य असतात .
डिएपी खताची कमतरता भरुन काढण्यासाठी पर्यायी खत वापरणे शेतकऱ्यांना गरजेचे आहे. स्फुरद युक्त खतामध्ये डीएपी खतानंतर एसएसपी (Single Super Phosphate) या खताची सर्वात जास्त मागणी असते .
एसएसपी खत हे देशातंर्गत तयार होते , यामध्ये सल्फर व इतर सूक्ष्म अन्नद्रव्यासह स्फुरद-१६ टक्के आढळून येतात. तेलबिया पिकांमध्ये सल्फर अन्नद्रव्यामूळे एसएसपी खताचा वापर फायदेशीर ठरणार आहे. डिएपी खताच्या एका गोणी ऐवजी एसएसपी तीन गोणी खत आणि युरिया अर्धी गोणीचा वापर डिएपीस चांगला पर्याय आहे.
एसएसपी बरोबरच संयुक्त खते जसे की एनपीके-12:32:16 व एन पीके-20:20:0:13, एनपीके-15:15:15 या खतांच्या वापरामुळे नत्र व स्फुरद बरोबरच पालाश हे अन्नद्रव्य सुध्दा पिकांना उपलब्ध होण्यास मदत मिळते . त्यामुळे पिकांसाठी या संयुक्त खतांचा वापर केल्यास पोषक ठरतो.
त्याच बरोबर ४६ टक्के स्फुरद अन्नद्रव्याची मात्रा ही टिएसपी (Triple Super Phosphate) या खता मध्ये असुन डिएपी खताच्या एका गोणी ऐवजी टिएसपी एक गोणीव युरिया अर्धी गोणी या खतांचा वापर केल्यास तो देखिल डिएपी खतास उत्तम पर्याय ठरू शकतो .
शेतकऱ्यांनी चालू खरिप हंगामामध्ये केवळ डिएपी खतावरच अवलंबून न राहता बाजारात उपलब्ध असलेल्या पर्यायी खतांचा वापर करावा असे आवाहन कृषी विभागाकडून राज्यातील सर्व शेतकरी बांधवाना केले आहे .