
पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या लाभार्थी शेतकऱ्यांना 18 व्या हप्त्याचे पैसे मिळवायचे असतील तर त्यांनी त्यांचा मोबाईल नंबर अपडेट करणे आवश्यक आहे. यासाठी अधिकृत पीएम किसान पोर्टलद्वारे 5 टप्पे ऑनलाईन देखील देण्यात आले आहेत.
पंतप्रधान किसान सन्मान निधीचे लाभार्थी असलेले शेतकरी 18 व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. लाभार्थ्याला किसान योजनेंतर्गत हप्त्याचे पैसे मिळवायचे असतील तर त्याने आपला मोबाईल नंबर अपडेट करणे आवश्यक आहे. यासाठी अधिकृत पीएम किसान पोर्टलद्वारे 5 टप्पे ऑनलाईन देखील देण्यात आले आहेत. मात्र, ज्या शेतकऱ्यांचा क्रमांक बदलला आहे किंवा हरवला आहे, अशा शेतकऱ्यांनीच क्रमांक अपडेट करणे आवश्यक आहे.
शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी ता योजनेच्या माध्यमातून वार्षिक ६,००० रुपयांची आर्थिक मदत मिळते . 3 हप्त्यांमध्ये ही रक्कम दोन दोन हजार रुपये देण्यात येते . गेल्या जूनमध्ये पीएम मोदींनी वाराणसीतील शेतकऱ्यांच्या खात्यात १७ व्या हप्त्यासाठी पैसे जारी केले होते. त्यानंतर 20,000 कोटींहून अधिक रक्कम 9.26 कोटींहून जास्त शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा करण्यात येणार आहे.
18 वा हप्ता कधी येणार?
शेतकऱ्यांच्या खात्यावर आतापर्यंत 11 कोटींहून जास्त पीएम किसान सन्मान निधीच्या योजनेअंतर्गत 3 लाख कोटींहून जास्त रक्कम पाठवली जाणार आहे . शेतकरी आता 18 व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. 29 ऑक्टोबर 2024 रोजी दिवाळी आहे. तसेच 18 व्या हप्त्याचे पैसे 20 ऑक्टोबरच्या आसपास मिळू शकतात असा अंदाज वर्तवला जात आहे.कारण, 4 महिन्यांच्या अंतराने हप्त्याचे पैसे येतात. १७ वा हप्ता जूनमध्ये मिळाला होता. अशा स्थितीमध्ये पुढील हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळण्याची शक्यता आहे.
तुमचा मोबाईल नंबर अपडेट करा..
प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या 18 व्या हप्त्याचे पैसे मिळविण्यासाठी, लाभार्थी शेतकऱ्यांना त्यांचे मोबाईल क्रमांक अपडेट करण्यास सांगितले आहे. अधिकृत पीएम किसान पोर्टलनुसार, लाभार्थी शेतकरी 5 सोप्या चरणांमध्ये त्यांचे मोबाईल नंबर अपडेट करू शकतात. सोपी आणि त्रासमुक्त मोबाईल नंबर अपडेट करण्याची प्रक्रिया स्पष्ट केली आहे.
शेतकरी आता पीएम किसान पोर्टलला भेट देऊन त्यांचा पीएम किसान लिंक मोबाईल नंबर सहजपणे अपडेट करू शकतात. फक्त http://pmkisan.gov.in ला भेट द्या आणि काही सोप्या चरणांमध्ये तुमचा नंबर अपडेट करा.
1. सर्वप्रथम pmkisan.gov.in वर जा आणि ‘फार्मर्स कॉर्नर’ खाली स्क्रोल करा.
2. आता ‘अपडेट मोबाईल नंबर’ या पर्यायावर क्लिक करा.
3. आधार क्रमांक किंवा नोंदणी क्रमांक आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करा आणि शोध पर्यायावर क्लिक करा.
4. यानंतर ‘एडिट’ पर्यायावर क्लिक करा.
5. आता नवीन मोबाईल नंबर टाकून अपडेट करा.
पीएम किसानचे ईकेवायसी करा
pm किसान सन्मान निधीचा 18 वा हप्ता मिळविण्यासाठी, लाभार्थ्यांनी त्यांचे eKYC अपडेट करणे गरजेचे आहे, नाही तर शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित राहू शकतात.
1.सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाइट pmkisan.nic.in वर जावे लागेल
2.यानंतर तुम्हाला ‘फार्मर्स कॉर्नर’ विभागात ‘eKYC’ वर क्लिक करावे लागेल.
3.आता तुम्हाला ‘OTP आधारित eKYC’ चा पर्याय मिळेल, त्यावर क्लिक करा आणि आधार नंबर टाका.
4.आता सर्च ऑप्शनवर क्लिक करा
5.यानंतर तुमचा आधार लिंक केलेला मोबाईल नंबर टाका आणि ‘गेट ओटीपी’ पर्यायावर क्लिक करा
6.यानंतर मोबाईलवर आलेला OTP टाका.
7.प्रविष्ट केलेल्या तपशीलांची पडताळणी करा.