शेतकऱ्यांनी तत्काळ करून घ्यावी ई-पीक नोंदणी

खरीप हंगाम 2023 मध्ये मान्सूनचे आगमन उशिरा झाले तसेच ऑगस्ट महिन्यात पावसाचा खंड पडल्याने दुष्काळ ग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती पंतप्रधान पिक विमा योजना व नैसर्गिक आपत्तीच अनुदान देण्यासाठी शेतकऱ्यांनी मोबाईल ॲप द्वारे 15 ऑक्टोबर पर्यंत ई पीक नोंदणी करून घ्यावी.  असे हवामान कृषी विभागाने केले आहे. 

पिकांची माहिती ऑनलाईन नोंदविण्यासाठी भूमी अभिलेख विभागाने ई पिक पाहणीचा उपक्रम केला आहे . यामध्ये शेतकऱ्यांना मोबाईलवर शेतातील पिकांची नोंदणी करता येते . जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात ई पिक नोंदणी प्रलंबित आहे. 

नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांची नुकसान झाल्यास व पिकांची नोंद असल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अचूक व लवकर मिळते.  पीक पेरणी अहवाल प्रक्रियेत शेतकऱ्यांचा सक्रिय सहभागामुळे कृषी पतपुरवठा सुलभ होतो.

पिक विमा आणि पीक नोंदणी दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ होते.ॲप वरती नोंद असल्यामुळे सरकारचे विविध योजनांचा लाभ घेण्यास कोणती अडचण येत नाही,  असे जिल्हा अध्यक्ष कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी कळविले.

ई पीक पाहणी ॲपद्वारे नोंदणी न केल्यास होणार शेतकऱ्यांचे नुकसान.

शेतात पेरलेल्या पिकांची शेतकऱ्यांनी स्वतः e pik pahani मोबाईल ॲपचा वापर करून नोंद करायची आहे. हि नोंद केली नसल्यास शेतकऱ्यांचा सातबाऱ्यावर रकान्यामध्ये असलेला पिकांचा रकाना कोरा राहणार आहे. पिकांची नोंद ई पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे न केल्यास खालील नुकसान शेतकऱ्यांस होणार आहे..

◼️ पेरणी झालीच नाही असे दाखविले जाईल किंवा शेतकऱ्यांचे शेत पडीक दाखविले जाईल.

◼️ पिक कर्ज मिळण्यास अडचणी निर्माण होईल.

◼️शेतकरी प्रधान मंत्री पिक विमा योजनेपासून वंचित राहील.

◼️ शासनातर्फे एखाद्या ठराविक पिकास मदत जाहीर झाली तर त्याचा लाभ मिळणार नाही.

◼️ शेतातील पिकांचे जंगली जनावरांनी नुकसान केले तर त्याचा लाभ मिळणार नाही.

शेतकरी बांधवांना e pik pahani ॲपद्वारे नोंदणी करण्यास मुदतवाढ मिळाली आहे. शेतकरी बांधवानी लवकरात लवकर त्यांच्या पिकांची नोंद स्वतः सातबाऱ्यावर करून घ्यावी. ई पीक पाहणी ॲप संदर्भात काही अडचण आल्यास आपल्या गावातील तलाठी किंवा संबधित अधिकारी साहेबांशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *