राज्य सरकारने जाहीर केलेल्या नमो शेतकरी सन्मान योजनेतील पहिल्या हप्त्याचे वितरण गुरुवारी दिनांक 26 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. शिर्डी येथे होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये हे वितरण होईल या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळ उपस्थित राहील.
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेमध्ये राज्य शासनाची भर घालण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या योजनेच्या पहिल्या हप्त्यासाठी १ हजार ७२० कोटी रुपयांच्या निधी वितरणास राज्य सरकारने मान्यता दिली आहे.
मात्र महा आयटीने लावलेल्या विलंबामुळे आणि कृषी विभागाने पडताळणी केलेल्या दिरंगाईमुळे ‘नमो’च्या वितरणात विलंब होत होता. शेतकरी सन्मान योजनेच्या चौदाव्या हप्त्यासाठी पात्र शेतकरी यांच्या खात्यामध्ये राज्याच्या योजनेचे पैसे वितरित करण्यात येतील असे सांगण्यात येत होते. मात्र कृषी विभागणी ऑगस्ट पासून विशेष मोहीम राबवीत पुन्हा पडताळणी केली. त्यामध्ये सात लाख 41 हजार शेतकऱ्यांची भर पडली आहे.
केंद्र चा १४ वा हप्ता ८५. ६० लाख शेतकऱ्यांना मिळाला होता. मात्र नवीन अभिलेखाची तपासणी केल्यानंतर राज्यातील पात्र लाभार्थ्यांची संख्या 93.07 लाख झाली आहे. वास्तविक केंद्राचा 14 वा हप्ता 85.60 लाख शेतकऱ्यांना दिला गेला 66 कोटी चाळीस लाख रुपये वितरित करण्यात आले . सध्या राज्य सरकारच्या ‘नमो’ लाभार्थी संख्या नेमकी किती यामध्ये स्पष्टता नाही.
कृषी विभागाची लाभार्थी पडताळणी 16 ऑक्टोंबर पर्यंत
– ‘पीएम किसान’च्या १४ व्या हप्त्याचे लाभार्थी : ८५. ६० लाख
– राज्यातील एकूण पात्र लाभार्थी : ९३. ०७ लाख
– अद्ययावत प्रलंबित लाभार्थी : १. १५ लाख
– भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत केलेले लाभार्थी : ९१. ९२ लाख
– बँक खाती आधारसंलग्न प्रलंबित लाभार्थी ः ५. ९८ लाख
– ई-केवायसी प्रमाणीकरण प्रलंबित लाभार्थी : ५. २६ लाख.