अजित पवारांची अर्थसंकल्पात मोठी घोषणा, शेतकऱ्यांना मिळणार मोफत वीज,मागेल त्याला सौरऊर्जा पंप देणार..

अर्थसंकल्पात राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी विविध योजनांची घोषणा केली आहे. आता शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार आहे. सरकार यासाठी मागेल त्याला सौरऊर्जा पंप देणार असल्याची माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली. या योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

15000 कोटी रुपयांचा प्रकल्प अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी हाती

शेतकऱ्यांना मोफत वीज मिळावी यासाठी मागेल त्याला सौरऊर्जा पंप दिले जाणार आहेत . या योजनेअंतर्गत 8 लाख 50 हजार शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप उपलब्ध करून देण्याचे अजित पवार यांनी जाहीर केले. शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी सौरऊर्जा आणि कृषी वाहिन्यांचे विलगीकरण कडून 15000 कोटी रुपयांचा प्रकल्प हाती घेण्यात आला असल्याचे अजित पवार यांनी जाहीर केले

प्रतीहेक्टर 5 हजार रुपयांचे कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मिळणार

गाव तिथे गोदाम योजना राबवण्यात येत आहे. जुन्या गोदामांची डागडुजी करण्यात येणार आहे अशी माहिती मिळाली .राज्यातील चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर असल्याचे सांगत संपूर्ण राज्यामध्ये ई पंचनामा प्रणाली लागू केली आहे. 1 रुपयांत पिक विमा देण्याची योजना कायम शेतकऱ्यांसाठी असणार आहे. तर, तसेच प्रतीहेक्टर 5 हजार रुपयांचे राज्यातील कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मिळणार आहे.

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतंर्गत पात्र कुटुंबाना वर्षाला तीन सिलेंडर मोफत.. 

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरु केली जात आहे. स्वच्छ इंधन उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे कारण यामुळे महिलांच्या आरोग्याला धोका निर्माण होणार नाही. त्यासाठी या योजनेतंर्गत पात्र कुटुंबाना वर्षाला तीन सिलेंडर मोफत देण्यात येणार आहेत . या योजनेचा लाभ राज्यातील 52 लाख 16 हजार 412 लाभार्थी कुटुंबांना मिळेल. मुलींना मोफत उच्च शिक्षण- शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, वैद्यकीय वास्तुशास्त्र,तसेच कृषि विषयक सर्व व्यावसायिक पदवी-पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेशित 8 लाख रुपयापर्यंतच्या वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागासवर्ग तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये 100 टक्के माफी देण्यात येणार असल्याचे अजित पावर म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *