![](https://krishi24.com/wp-content/uploads/2024/01/अखेर-पहिल्या-टप्प्यात-५-जिल्ह्यांना-गारपीट-नुकसान-भरपाई-जाहीर.webp)
नोव्हेंबर महिन्यामध्ये झालेली गारपीट आणि अवेळी पावसामुळे नुकसान ग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी अखेर मदतीची प्रतिक्षेत होती ती आता संपली आहे. आणि निधीचे वितरण करण्यासाठी सुरुवात झालेली आहे. एकंदरीत आपण जर पाहिलं 32 जिल्ह्यामध्ये नुकसान झालेले आहे. अशाप्रकारे शासनाच्या माध्यमातून ग्वाही (कबुली) देण्यात आली आहे आणि याच्यासाठी जिल्ह्याच्या माध्यमातून प्रस्ताव मागवून त्या बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून मदत केली जाईल.
अशा प्रकारे या झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये सांगण्यात आले होत आणि आता नुकसानग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पंचनाम्याचे अहवाल आले आहेत. त्यांना मदतीचे वितरण करायला सुरुवात झाली आहे आणि याच्या मधील आज पहिला टप्पा पाच जिल्ह्यात वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे . एकंदरीत बत्तीस जिल्ह्यामधील साधारपणे 26 लाखापर्यंत शेतकरी यांच्या अंतर्गत बाधित झाले आहेत . अशा प्रकारची माहिती शासनाच्या माध्यमातून देण्यात आली आहे. त्या पैकी आज नऊ जानेवारी 2024 चा जो प्रस्ताव सादर झालेला आहे या प्रस्तावाच्या माध्यमातून जी मागणी करण्यात आली या मागणीनुसार आज 10 जानेवारी 2014 रोजी नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांसाठी मदतीचा जीआर काढण्यात आलेला आहे. याच्यामध्ये नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, आणि जळगाव या पाच जिल्ह्याला पहिल्या टप्प्यामध्ये मदत वितरित करण्यात आली आहे. त्याच्यासाठी आपण जर पाहिलं तर नाशिक जिल्ह्यातील 65849 शेतकरी पात्र करण्यात आले आहेत आणि या शेतकऱ्यांना 99 कोटी 78 लाख रुपयांच्या मदतीचे वितरण केले जाणार आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील एकूण एकवीस हजार 683 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत . 28 कोटी 37 लाख रुपयाचे नुकसान भरपाई शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. धुळे जिल्ह्यातील फक्त सातशे ३२ शेतकरी पात्र करण्यात आले असून त्यांच्यासाठी 79 लाख रुपयांची नुकसानभरपाई दिली जाणार आहे . नंदुरबार जिल्ह्यातील एकूण पाच हजार 756 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत त्यासाठी चार कोटी 95 लाख रुपयांची नुकसान भरपाई दिली जाणार आहे . जळगाव जिल्ह्यामध्ये एकूण 13 हजार 471 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत आणि दहा कोटी 20 लाख रुपयांचे नुकसान भरपाई शेतकऱ्यांना दिली जाणार आहे .
एकंदरीत नाशिक विभागातील एक लाख सात हजार 491 शेतकऱ्यांचे तीन प्रस्ताव हे नऊ जानेवारी 202४ रोजी सादर करण्यात आले होते आणि या तिन्ही प्रस्तावाला मिळून या ठिकाणी आता 120 कोटी दहा लाख रुपयांचे नुकसान भरपाई हि नाशिक विभागासाठी दिली जाणार आहे. एकंदरीत आपण जर पाहिलं याच्या मध्ये एकूण 32 जिल्ह्याचा समावेश आहे. ज्या ३२ जिल्ह्यांपैकी धुळे असेल नंदुरबार किंवा इतरही मराठवाड्यातील काही जिल्हे येतात. पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे येतात या जिल्ह्यांना नुकसान भरपाईची रक्कम खूप कमी आहे त्या जिल्ह्यातील शेतकरी जी बाधित आकडेवारी ती खूप कमी आणि त्याच्या व्यतिरिक्त जे जास्त बाधित झालेले बुलढाणा ,अकोला असेल छत्रपती संभाजीनगर असेल जालना परभणी असेल हिंगोली असेल अशा जिल्ह्यांचा समावेश आहे . या जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई दिली जाणार आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी बाधित आहेत . नाशिक जिल्ह्याला या जीआरमध्ये मंजुरी देण्यात आली आहे. आणि उर्वरित जे जे जिल्हे आहेत त्या त्या जिल्ह्याच्या संदर्भातील सेपरेट (अलग) जीआर जसे आज पहिला टप्पा आलेला आहे याच्या नंतर टप्पा दोन, टप्प्यातील जसे जसे विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून प्रस्ताव दिले जातील तसतसे त्याच्या संदर्भात जीआर घेतले जातील आणि ज्या जिल्ह्याच्या मदतीचा जीआर प्रसिद्ध केला जाईल त्याच्याबद्दल आपण वेळोवेळी माहिती घेण्याचा प्रयत्न करूया,
शासन निर्णय पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.