अखेर लासलगाव बाजार समितीत कांदा लिलाव सुरू , सरासरी किती मिळतोय भाव जाणून घ्या सविस्तर…

लेव्हीप्रश्र्नी व्यापारी व माथाडी मंडळ यांच्यातील वादामुळे गेल्या आठ दिवसांपासून कांद्याचे लिलाव बंद होते. आज अखेर लासलगाव बाजार समितीत कांद्याचे लिलाव सुरू झाले. स्थानिक बाजार समितीतील व्यापारी लिलावामध्ये सहभागी झाले नाहीत परंतु  विंचूर उपबाजार समितीतील व्यापारी व नवीन परवानेधारक यांनी लिलावात सहभाग घेत कांद्याचे लिलाव पूर्ववत सुरू केले.

गेल्या आठवडाभरापासून लेव्हीप्रश्र्नी व्यापारी व माथाडी मंडळ यांच्यातील सुरू असलेल्या वादामुळे कांद्याचे लिलाव ठप्प झालेले होते . लासलगाव बाजार समितीत हमाली मापारी प्रश्नी लिलाव प्रक्रिया बंद होती. लासलगाव बाजार समितीचे लिलाव अखेर सुरू झाले.

उन्हाळ कांद्याला प्रति क्विंटला मिळतोय इतका भाव..

या लिलावामध्ये मात्र स्थानिक बाजार समितीतील व्यापारी सहभागी झाले नाही . परंतु लिलावामध्ये नवीन परवानेधारक व विंचूर उपबाजार समितीतील व्यापारी यांनी सहभाग घेत कांद्याचे लिलाव पूर्ववत सुरू केले. बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याला सरासरी 1 हजार 500 रुपये भाव मिळाला. तर जास्तीत जास्त २९०० रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला.

मागील आठ दिवसांपासून लेव्ही प्रश्नांवरून माथाडी मंडळ व व्यापारी यांच्यात सुरू असलेल्या वादामुळे नाशिक जिल्ह्यातील लासलगावसह १५ बाजार समित्यांमधील कांद्यासह शेतमाल लिलाव प्रक्रिया बंद आहे. शेतकऱ्यांचे या वादामुळे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर व्यापारी
व जिल्हाधिकारी, माथाडी मंडळ यांच्यात लेव्ही प्रश्नांसंदर्भात दोन ते तीन बैठका झाल्या परंतु माथाडी मंडळ व व्यापारी आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्यामुळे तोडगा निघाला नाही. परिणामी आठ दिवसांपासून बाजार समित्या बंदच होत्या. व्यापारी लिलावात सहभागी होत नसतील तर त्यांचे परवाने रद्द करा, बाजार समित्यांनी व्यापाऱ्यांनी दिलेल्या सुविधा बंद करा असे आदेश काल जिल्हा निबंधकांनी लासलगाव येथील संचालक मंडळाच्या बैठकीत दिल्याने जिल्हा निबंधकांनी लासलगाव बाजार समितीत सुरू करण्यात आले आहे.

Leave a Reply