राज्याच्या पणन मंडळाकडून जीआय मानांकनप्राप्त उत्पादनाच्या विक्रीसाठी या योजनाचा घ्या लाभ ,वाचा सविस्तर ..

भौगौलिक चिन्हांकन मिळालेल्या मालाला विशेष महत्त्व दिले जाते.  राज्यामध्ये भौगौलिक चिन्हांकन विविध प्रदेशानुसार तेथील प्रसिद्ध असलेल्या मालाला मिळत असतो . तसेच मालाच्या दर्जामध्ये ही वाढ होत असते ,विक्रीसही मदत होत असते. साधारण २८ शेतमालाला महाराष्ट्रामध्ये जीआय मानांकन मिळालेले आहे.

ज्या शेतमालाला महाराष्ट्र राज्य पणन मंडळाकडून , कृषीपिके आणि प्रक्रिया उत्पादनांना, भाजीपाला पिके, मसाला पिके, फळपिकांना, जीआय मानांकन मिळालेला आहे ,अशा उत्पादनाच्या विक्रीमध्ये शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच विक्री मध्ये वाढ होण्यासाठी काही योजना राबवण्यात आल्या आहेत .

योजनांचे उद्दिष्टे

भौगोलिक चिन्हांकन/मानांकन संदर्भातील माहिती सर्व घटकापर्यंत पोहोचवणे, उत्पादकांना नोंदणीसाठी प्रोत्साहीत करणे व नोंदणीचे आवश्यकते बाबतची माहिती उत्पादकांना देणे, थेट ग्राहकांपर्यत भौगोलिक मानांकन उत्पादने पोहोचविणे. यासाठी महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाकडून राज्यातील भौगोलिक मानांकन प्राप्त कृषी उत्पादनांचे प्रचार, नोंदणी ,प्रसिद्धी, व मुल्यसाखळी विकसीत करण्यासाठी ४ स्वतंत्र अर्थसहाय्याच्या योजना सुरु करण्यात आलेल्या आहेत.

योजना क्र. १

मानांकन प्राप्त / भौगोलिक चिन्हांकन कृषी उत्पादनांचे प्रचार व प्रसिद्धीसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी अनुदान योजना
लाभार्थी : भौगोलिक मानांकन प्राप्त उत्पादनांची मालकी असणाऱ्या संस्था.
लाभाचे स्वरूपः एक दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजनासाठी (किमान १०० शेतकऱ्यांसाठी) कमाल मर्यादा रूपये रू. १०,०००/- प्रति प्रशिक्षण

योजना क्र. २

उद्देशः भेसळीला प्रतिबंध करणे, विशिष्ट भौगौलिक क्षेत्रात उत्पादीत होणारी उत्पादने चिन्हासह विक्री करणेसाठी बाजार विकासा करीता (सुयोग्य पॅकींग, ब्रँडींग, बारकोड,लेबलिंग, वेबसाईट विकास इ.) अर्थसहाय्य करणे.भौगोलिक मानांकन नोंदणीकृत नैसर्गिक गुणवत्ता असलेली उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहचवणे,

लाभार्थी : भौगोलिक मानांकन प्राप्त उत्पादनांची मालकी असणारी संस्था.

लाभाचे स्वरुपः कृषि उत्पादनाचे मालकी असणाऱ्या संस्थेला उत्पादनांच्या बाजार विकासाठी येणाऱ्या खर्चाच्या ५०% अथवा जास्तीत जास्त रक्कम रु.३,००,०००/- पर्यंत अर्थसहाय्य संबंधित देण्यात येईल.

योजना क्र. ३

भौगोलीक चिन्हांकन / मानांकन नोंदणीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याकरीता नोंदणी शुल्कासाठी अनुदान

लाभाचे स्वरुप : भौगालिक मानांकन नोंदणीसाठी प्रती शेतकरी संबंधित कृषि उत्पादनाचे मालकी असणाऱ्या संस्थेला रु. २००/- अनुदान देण्यात येईल.

योजना लाभार्थी : भौगोलिक मानांकन प्राप्त उत्पादनांची मालकी असणारी संस्था.

योजना क्र. ४

भौगोलिक चिन्हांकन / मानांकन उत्पादनांच्या स्टॉलकरीता कृषि पणन मंडळाच्या फळे व कृषिमाल महोत्सव उपक्रमामधील अर्थसहाय्य योजना

स्वरुप : प्रति स्टॉल रु. ३०००/- अर्थसहाय्य

लाभार्थी : भौगोलिक मानांकन प्राप्त उत्पादनांची मालकी असणारी संस्था.

Leave a Reply