मराठवाडा, विदर्भात पावसाला सुरुवात, संपूर्ण राज्यात आज यलो अलर्ट हवामान विभागाचा अंदाज ..

महाराष्ट्रामध्ये वेळेअगोदर आलेला मान्सून विदर्भात मात्र प्रवेश करण्यापूर्वी रेंगाळला होता. मात्र आजपासून पुन्हा मान्सून सक्रीय झाला आहे. मराठवाड्यातील विदर्भातील काही भागांत पावसाला सुरुवात झाली आहे. तसेच मुंबई हवामान विभागाने संपूर्ण राज्यात आज यलो अलर्ट दिला आहे. सोमवारी सकाळापासून मुंबई, पुणे शहरात पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यात सर्वत्र मान्सून पोहचला आहे. हवामान विभागाने मध्यम ते मुसळधार स्वरुपाच्या पावसाची शक्यता मध्य महाराष्ट्र, मराठवाडा ,कोकण व विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये दिली आहे.

मराठवाडा, विदर्भात पाऊस…

रविवारी रात्री वाशिम जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात जोरदार पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे पेरणी झालेल्या हळद, कपाशी या पिकांना चांगला आधार मिळाला आहे.शेतकऱ्यांमध्ये पावसामुळे आंनदाचे वातावरण निर्माण झाले आहे. वाशिम जिल्ह्यामधील पाणी प्रकल्पामध्ये पाणी साठवण्यासाठी आणखी दमदार पावसाची आवश्यकता आहे.

परभणी शहरासह जिल्ह्यात सर्वदूर पाऊस पडला.जोरदार पावसाने शेती कामांना वेग येणार आहे. पावसाला नांदेड जिल्ह्यामध्ये सुरुवात झाली आहे. परंतु शेतकरी पेरणीसाठी मोठ्या पावसाची वाट बघत आहेत.

नांदेड जिल्ह्यात पावसाची आतापर्यंत केवळ 35 मिलीमीटर नोंद झाली आहे. औंढानागनाथ तालुक्यात जोरदार पाऊस झाला. पावसामुळे खरीपाच्या पेरणीला त्या भागात वेग आला आहे. शेतकरी आता सोयाबीन, मूंग, उडीदसह कापसाची लावगड करत आहेत.

मुंबईत धरणांमध्ये 22.5 %पाणीसाठा..

शहापुरतील धरण क्षेत्रात पावसाने दडी मारली आहे. मुंबईला पाणी पुरवठा कारणाऱ्या भातसा धरण क्षेत्रात पाऊस न झाल्याने पाणी पाणीसाठा कमी झाला आहे. अवघा 22.5 % पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. 10 ते 12 दिवस या भागात जर पाऊस झाला नाही तर मुंबईकारांवर पाणीसंकट येऊ शकते.

20 जूननंतर राज्यात पावसाचा जोर वाढणार..

पावसाने राज्यात विश्रांती घेतली होती. परंतु आता पाऊस सक्रीय होऊ लागला आहे. राज्यात मान्सूनचा जोर 20 जूननंतर वाढणार आहे. 19 ते 20 जूननंतर मान्सूनसाठी अनुकूल वातावरण निर्माण होणार असल्याचे हवामान विभागाने माहिती दिली .

उत्तर भारतात उष्णतेची लाट..

उत्तर भारतात उष्णतेची लाट कायम आहे. अनेक भागात तापमान 50 डिग्रींवर पोहोचले आहे. उत्तर प्रदेशात आतापर्यंत 36 लोकांचा उष्मघातामुळे मृत्यू झाला आहे.वाराणसी प्रयागराज कानपूरमध्ये तापमान 46 अंशावर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *