आता अगोदर करा उगवण चाचणी , मगच बियाणे पेरा

ugavan chachni

आता खरीप हंगामास सुरुवात होत आहे. सगळ्या शेतकऱ्यांची पेरणी ची लगबग सुरु आहे. या संदर्भात कृषी विभागामार्फत मार्गदर्शन करण्यात आले आहे की शेतकऱ्यांनी घरगुती बियाणे उगवणे क्षमता तपासणी करुन पेरणी करावी.प्रत्येक वर्षी नवीन बियाणे खरेदी करुनच पेरणी करावी , असा शेतकऱ्यांचा समज असतो . परंतु मुग, चवळी, सोयाबिन, हरभरा, गहू, भूईमुग या पिकांमध्ये स्वपरागसिंचन होत असल्यामुळे या पिकांमध्ये कोणतेही संकरित वाण उपलब्ध नाही.

जेव्हा आपण सरळ बियाणे विकत घेतो तेव्हा ते त्यापासून तयार केलेले बियाणे आपण पुढील दोन वर्षांसाठी वापरू शकतो. म्हणजे दरवर्षी नवीन बियाणे खरेदी करत राहावे लागत नाही. जर आपण महागडे बियाणे विकत घेतले जे उगवत नाहीत, तर आपण खत आणि इतर गोष्टी वाया घालवतो जे आपण लागवड करण्यासाठी वापरतो. या साठी शेतकऱ्यांनी बियाण्यांची उगवण क्षमता तपासूनच पेरणी करावी. जर एखाद्या शेतकऱ्याकडे गेल्या वर्षीचे अतिरिक्त सोयाबीन असेल तर ते सोयाबीन उगवण की नाही हे पाहण्यासाठी घरी चाचणी करून पैसे वाचवू शकतात. यामुळे त्यांची फसवणूक टाळण्यासही मदत होईल. शेतकऱ्यांना या हंगामात लागवड करण्यासाठी स्वतःचे सोयाबीन बियाणे वापरण्यास कृषी विभागाने आव्हान केले आहे. परंतु त्यांना प्रथम बियाणे वाढेल याची खात्री करणे आवश्यक आहे. बियाणे अंकुरते की नाही हे पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी घरी एक साधी चाचणी करावी, अशी कृषी विभागाचे आव्हान आहे.

गोणपाट वापरुन उगवण क्षमता तपासणी

या पध्दतीमध्ये प्रत्येक गोणीतून खोलवर हात घालून थोडेसे धान्य घ्यावे लागेल व ते एकत्र करा , तुम्हाला गोणपाटाचे सहा चौकोनी तुकडे करावे लागतील , व ते धुऊन घावे लागतील .एक तुकडा जमिनीवर पसरवा. पोत्यातून काढलेल्या धान्यातून सरसकट शंभर दाणे मोजून दीड ते दोन से.मी. अंतरावर दहा-दहाच्या रांगेत गोणपाटाच्या एका तुकड्यावर ओळीत ठेवावे. अशा प्रकारे शंभर दाण्यांचे तीन नमुने तयार करावे.दुसऱ्या गोणपाटाचा तुकडा बियाणांवर अंथरुन थोडेथोडे पाणी शिंपडावे.बियाणांसकट गोणपाटाची गुंडाळी करावी व गारव्याच्या ठिकाणी ठेऊन द्यावे.
गोणपाठाच्या गुंडाळी थोडया थोडया कालावधीनंतर पाणी टाकून ओले करत राहावे. ६ ते ७ दिवसांनी ही गुंडाळी उघडून पाहावी ,व चांगले कोंब आलेले दाणे मोजा तीनही गुंडाळींपैकी ७० किंवा त्या अधीक दाणे जर कोंब आलेले असतील तर बियाणे बाजारातील बियाणांसारखे गुणवत्तेचे आहेत, असे समजता येईल. मात्र ७० पेक्षा जर कमी बियाण्यांना कोंब आले असतील पेरणी करताना बियाणांचे प्रमाण वाढवावे लागेल . पेरणी करत असताना बियाणांना जिवाणू संवर्धक व बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी.

वर्तमानपत्राचा कागद वापरुन उगवण क्षमता तपासणी

वर्तमानपत्राचा पेपर घ्यावा त्याच्या चार घड्या कराव्यात त्यामुळे कागद जाड होतो कागद पाण्यामध्ये ओला करावा त्या कागदावरती दहा बिया एका रांगेमध्ये ठेवाव्यात त्यानंतर त्या कागदाची गोल गुंडाळी करावी व ती गुंडाळी पॉलिथीन पिशवीतमध्ये ठेवावी अशा प्रकारे शंभर बियांच्या दहा गुंडाळे बनवाव्यात व त्याही पिशवीत ठेवावीत चार दिवसांनी त्याला फुटलेले अंकुर मोजावे अशा प्रकारे आपण बियाण्याची उगवण क्षमता चेक करू शकतो.

पाण्यात भिजवून उगवण क्षमता तपासणी

आता गोणपाट पद्धत व वर्तमान पत्र पहिली आता आपण पाण्यात भिजवून उगवण क्षमता तपासणी पाहणार आहोत . तीन पेल्यात पाणी घ्यावे . व यामध्ये १०० दाण्याचे सामान तीन भाग करून ते पेल्यात ५ते ६ मिनिटे भिजत ठेवावे . जो दाणा ५ नेते ६ मिनटामध्ये फुगतो तो अयोग्य समजावा. ज्या दाण्यावर सुरुकुत्या पडतात ते दाणे योग्य नाही. जे दाणे बियाणासाठी चांगले आहेत त्यांचे टरफल शाबूत राहतात . .यामुळे शंभर दाण्यापैकी जर सत्तर त्यापेक्षा जास्त दाणे न फुगलेले, सुरकुत्या न पडलेले असेल तर बियाणे बाजारातील बियाण्यांसारखे गुणवत्तेचे आहेत, असे समजावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *