गोकुळने बायोगॅससाठी राबविली हि योजना, पशुपालकांना कसा मिळतोय लाभ..

‘एन. डी. डी. बी. मृदा व सिस्टीमा बायो कंपनी’च्या माध्यमातून गोकुळ’दूध संघातर्फे समृद्धी कार्बन क्रेडिट बायोगॅस योजना राबवली आहे.मागील वर्षभरात जिल्ह्यात ५,७४३ बायोगॅस प्रकल्प उभे झाले आहेत , तब्बल त्यातून ८ कोटी ३२ लाख रुपयांचे गॅस उत्पादन झाले आहे. देशात ही योजना राबविण्यात सुरत (गुजरात) दुसऱ्या क्रमांकावर आहे.’गोकुळ’ आघाडीवर आहे.

गोठ्यामध्ये घरच्या घरी शेणापासून इंधन दूध उत्पादक शेतकऱ्यांना तयार करता यावे, त्याचबरोबर गॅस सिलिंडरवर होणाऱ्या खर्चात बचत व्हावी, यासाठी ‘गोकुळ’च्या दूध उत्पादकांसाठी ही योजना राबवण्यात आली आहे .पाच हजार बायोगॅसचे उद्दिष्ट जरी पहिल्या टप्प्यात दिले असले, तरी त्यापेक्षा जास्त युनिट उभारली आहेत. शेतकऱ्यांना २० कोटी २५ लाख ५५ हजार ६१० रुपये अनुदानाच्या माध्यमातून मिळाले आहेत.

अशी आहे बायोगॅस योजना
युनिटची किंमत – ४१२६०
दूध उत्पादकाचा हिस्सा – ५९९०
सिस्टीमा कंपनीकडून अनुदान – ३५२७०

हे आहेत फायदे
◼️शेण व मलमूत्राचा उठाव वेळेत होत असल्यामुळे गोठा कायम स्वच्छ राहतो.
◼️घरातील चुलीचा धूर बंद,कमी खर्चातील युनिटमधून मुबलक गॅस उत्पादन.
◼️गोठ्यातून लांब शेणाची वाहतूक करून शेण लावणे, त्याला सुकवणे इ काम महिलांचे वाचते.
◼️प्रति युनिट ५०० असे २८ लाख ७१ हजार ५०० रुपये ‘गोकुळ’ संघालाही अनुदान.
◼️दहा वर्षे सिस्टीमा कंपनी युनिटची देखभाल करणार.


युनिटच्या दरात वाढ शक्य..
आणखी १० हजार बायोगॅस युनिटची मागणी गोकुळ’ने २०२४-२५ या वर्षात केली आहे. दूध उत्पादकांकडून याची मागणी वाढू लागली आहे. परंतु , युनिटच्या दरात वाढ होण्याची शक्यताही आहे.

स्लरी शेतीला उपयुक्त..

हजारो टन स्लरीचे उत्पादन या प्रकल्पातून होते, शेताला खत म्हणून बायोगॅसमधील स्लरी उपयोगी आहे. शेतकऱ्यांनी बायोगॅसमधून बाहेर पडणाऱ्या स्लरीचा वापर शेतात केला तर इतर खतांची बचत होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *