शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी, यंदा वेळेपूर्वी मान्सून दाखल होण्याची शक्यता…

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी या वर्षी मान्सूनची वाटचाल वेळे अगोदर सुरु आहे. वेळेपूर्वीच नैऋत्य मोसमी वारे (मान्सून) अंदमानमध्ये दाखल होणार आहे. अशीच मान्सूनची वाटचाल राहिली तर यंदा वेळे अगोदर मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाचे माजी प्रमुख माणिकराव खुळे यांनी मान्सून १९ मे (रविवार) पर्यंत अंदमानमध्ये दाखल होणार असल्याची माहिती दिली. त्यामुळे शेतकरी राजाच्या चेहऱ्यावर आनंद झळकणार आहे. गेल्या वर्षी पाऊस कमी झाला होता त्यामुळे यंदा वेळेवर येणारा मान्सून शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे.

मान्सूनची पुढील दोन दिवसांत अधिक प्रगती..

दक्षिण बंगालच्या उपसागरात निकोबार बेटे व दक्षिण अंदमान समुद्रामध्ये मान्सूनच्या हालचाली दिसून येत आहे. २२ मे पर्यंत दरवर्षी मान्सून दाखल होतो. समुद्र सपाटीपासून १ ते १.५ किलोमीटर उंचीवर सध्या दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटांवर नैऋत्येकडून येणारे वारे सुरु आहे. मान्सून येणार असल्याची सूचना हे वारे देतात. पुढील दोन दिवसांमध्ये बंगालच्या उपसागरात व अंदमान बेटावर मान्सूनची अधिक प्रगती होणार आहे.

मान्सूनची वाटचालीवर केरळमधील आगमन ठरणार..

नैऋत्य मोसमी वारे बंगालच्या उपसागरात दस्तक देणार आहेत . यामुळे १ जून ला मान्सून देशाच्या प्रवेशद्वाराजवळ म्हणजे केरळला येणार आहे. बंगालच्या उपसागरामध्ये मान्सूनची वाटचाल कशी राहिल,यावरती १ जूनची तारीख निश्चित ठरवली जाणार आहे.

१९ मे पर्यंत अवकाळी पाऊस कायम राहणार आहे. १९ मे नंतर अवकाळी पावसाचे वातावरण कमी होणार आहे. यंदा पाऊस सरासरीपेक्षा जास्त होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यंदा पाऊस 106% राहणार असल्याचा अंदाज आहे. त्यानंतर मे महिन्याचा शेवटी सुधारित अंदाज पुन्हा हवामान विभाग व्यक्त करणार आहे.

पुढील 5 दिवसांत या ठिकाणी मुसळधार पाऊस..

सध्या झारखंड आणि बिहारसह अनेक राज्यांमध्ये पाऊस पडत आहे. तसेच , आयएमडीने ताज्या अलर्टनुसार सध्या कर्नाटकमध्ये चक्रीवादळ सक्रीय आहे. त्यामुळे पुढील 5 दिवसांत विदर्भ, छत्तीसगड, मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये विजांचा कडकडाट ,गडगडाटी वादळ, आणि सोसाट्याचा वारा (40-60 किमी प्रतितास) यासह मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *