नमस्कार मित्रांनो म्हाडा, सिडकोमध्ये घर घेणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी उत्पन्नाच्या मर्यादेत बाबत मोठा निर्णय सर्वसामान्यांना फायदा का तोटा ?म्हाडाच्या घरांसाठी लॉटरी काढण्यात आली होती आणि या लॉटरीसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली असून , ज्यांनी लॉटरीसाठी अर्ज केले आहेत अशांना अनामत रक्कम भरण्याची अखेरची तारीख संपली आहे . या निर्णयाचा लाभ या अर्जदारांना मिळणार की नाही याबाबत लवकरच घोषणेची शक्यता आहे . आपले स्वतःचे घर असावे पणते परवडणारी असावे अशी प्रत्येकाची इच्छा असते.
त्यासाठी सिडको यासारखे घरे बांधणारे प्राधिकरणाकडे इच्छुक अर्जदारांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. लाखो लोक या परवडणाऱ्या घरांसाठी अर्ज करत असतात मात्र त्यासाठी ठरविण्याचे निकष काहीजण पूर्ण करू शकत नाहीत यातील महत्त्वाचा निकष म्हणजे उत्पन्न मर्यादा या मर्यादां मुळे अनेक जण इच्छा असूनही घरांसाठी अर्ज करू शकत नाहीत . मात्र केंद्र सरकारने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे . प्रधानमंत्री आवास योजना नागरी अंतर्गत मुंबई महानगर क्षेत्र साठी एमएम आर आर्थिक कमकुवत घटकांसाठी म्हणजे ईडब्ल्यूएस उत्पन्नाच्या निकषात वाढ करण्यात यावी अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारला केली होती. मुख्य मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र सरकारने 21 जून 2023 रोजी एक पत्र केंद्र सरकारला पाठविले होते. पत्रात आर्थिक कमकुवत घटकांसाठी म्हणजे ईडब्ल्यूएस गटासाठी उत्पन्नाचा निकष आहेत.
तीन लाखा ऐवजी सहा लाख रुपये वाढ करावी अशी विनंती करण्यात आली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्याशी संपर्क करून त्यांना या संदर्भात विनंती केली . या संदर्भात केंद्रीय नगरविकास आणि गृहनिर्माण मंत्रालयाने आदेश काढला आहे . महाडा सिडकोच्या घरांसाठी अर्ज करणाऱ्या एम एम आर क्षेत्रातील नागरिकांना केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे.प्रधानमंत्री आवास योजनेतील परवडणाऱ्या घरांसाठी मुंबई महानगर क्षेत्रात आर्थिक कमकुवत घटकांसाठी उत्पन्नाचा निकष आता ३ लाखांवरून ६ लाख रुपये करण्यात आला आहे. याचा फायदा लाखो नागरिकांना होणार आहे. राज्य सरकारला केंद्र सरकारने पत्र पाठवून ही मागणी मान्य करण्यात आल्याचे कळले आहे.
या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आभार मानले . आता जी म्हाडा मुंबईची लॉटरी झालेली आहे. त्याच्यामध्ये पी एम ए वाय साठी तुम्हाला अर्ज करायचा असेल गोरेगाव पहाडी साठी जी उत्पन्न मर्यादा होती ती तीन लाखापर्यंत होती . परंतु आता ती तीन लाखावरून सहा लाख करण्यात आलेली आहे . परंतु आता महाडा मुंबईची लॉटरी झालेली आहे त्याच्यामुळे आता सहालाख रुपये उत्पन्न मर्यादा आता इथून पुढे म्हाडाची किंवा सिडकोची लॉटरी येईल त्यांच्यासाठी हे निकष लागू होतील असे अपडेट आहे .