राज्यात पुढील 24 तासात काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज ,विदर्भ, मराठवाड्यात अवकाळी पावसाचे संकट ,जाणून घ्या हवामान अंदाज ..

राज्यामध्ये उन्हाचा चटका सूर्य कोपल्याने वाढला आहे. यामध्ये आता गारपिटीला आणि वादळी पावसाला पोषक हवामान तयार होत आहे. आज (ता. ८) मराठवाड्यात आणि मध्य महाराष्ट्रातही वादळी पावसाचा इशारा तसेच विदर्भात ही वादळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा, हवामान विभागाने दिला आहे.

ओडिशापासून मराठवाडा,छत्तीसगड, विदर्भ, कर्नाटक ते उत्तर तमिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.सध्या राज्यामध्ये ढगाळ आकाश होत असून, उकाड्यासह ,उन्हाच्या झळा, वादळी पावसाला पोषक हवामान होत आहे.

आज (ता. ८) विदर्भातील अमरावती, अकोला, गोंदिया ,नागपूर, जिल्ह्यामध्ये वादळी पाऊस गारपिटीचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे.तर उर्वरित मराठवाडा , मध्य महाराष्ट्र, विदर्भ या भागांना वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज तर काही भागांना गारपिटीचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

सोलापूर आणि चंद्रपूर येथे रविवारी (ता. ७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील उच्चांकी ४२.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.तर अनेक भागात तापमानाचा पारा ४१ अंशांच्या पुढेच आहे. राज्यात उन्हाचा चटका आज (ता. ८) कमी-अधिक होण्याची शक्यता आहे.

– या वादळी पावसासह गारपिटीचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :

अमरावती, अकोला,गोंदिया, नागपूर,

– वादळी पाऊस, गारपीट इशारा (येलो अलर्ट) :

नांदेड, हिंगोली,

– वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

छत्रपती संभाजीनगर,धाराशिव, परभणी,जळगाव, नगर, वाशीम, बुलडाणा, यवतमाळ, वर्धा, जालना, बीड, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली.

४१ अंशांपेक्षा अधिक कमाल तापमान असलेली ठिकाणे

चंद्रपूर ४२.४, सोलापूर ४२.४, यवतमाळ ४२, ब्रह्मपुरी ४१.४,अकोला ४१.५, वर्धा ४१.४, वाशीम ४१.४, अमरावती ४१,परभणी ४१, गडचिरोली ४१.

Leave a Reply