कापूस बाजारातून शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आली आहे . आता बहुतेक शेतकऱ्यांनी कापूस विकला अगदी बोटावर मोजणे एवढा शेतकऱ्यांकडे कापूस आहे . आज देशातील बाजारात कापूस दरात तीनशे ते पाचशे रुपयांची सुधारणा दिसून आली आहे.
ऑगस्ट महिन्यात कापूस दरात आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे. असे जाणकारांनी सांगितले असून ,कापूस भाव सुधारणा होण्याची संकेत मागील आठवड्यापासूनच मिळत होते. अमेरिकेतील महत्त्वाच्या कापूस उत्पादक भागांमध्ये उष्णतेचा फटका बसत आहे ,त्यातच चीनकडून कापसाला मागणी वाढल्याचे सांगितले जात आहे.
चीन स्टॉक मध्ये ठेवलेला कापूस विकत आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरात सुधारणा झाली. अमेरिकेच्या इंटरकाॅन्टीनेंटल एक्सचेंजवर कापूस दरात आज दुपारपर्यंत एक टक्क्यांनी वाढ झाली होती. कापूस वायदे ८५.१८ सेट प्रतिपाउंडवर होते.
देशातील वायद्यांमध्ये ही आज सुधारणा झाली होती. कापूस वायद्यांमध्ये आज दोनशे रुपयांनी वाढ होऊन 60000 च्या पुढे गेले होते . कापूस वायद्यामध्ये मागील आठवड्यापासून चढ-उतार चालू आहे.
आज कापसाच्या भावात क्विंटल मागे तीनशे ते पाचशे रुपयांची सुधारणा झाली असून, देशातील बाजारात कापसाला गुणवत्तेप्रमाणे सहा हजार सातशे ते सात हजार तीनशे रुपयांचा भाव मिळत आहे. तसेच देशातील बाजारांमध्ये भावही वेगवेगळ्या दिसून येत आहे. कापसाचा कमाल भाव काही बाजारांमध्ये 7500 रुपयांवर पोहोचलेला होता.
व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार देशातील बाजारात सरासरी १८ हजार गाठींच्या दरम्यान आवक झाली . ही आवक खूपच जास्त आहे.एरव्ही ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात कापूस आवक ४ हजार गाठींच्या दरम्यान राहते. पण दुसरीकडे कापसाला उठाव असल्याने भाव वाढताना दिसत आहे.
कापसाच्या भावात पुढील काळात काहीसे चढ-उत्तर दिसू शकतात. पण दरातील वाढ जास्त कमी होणार नाही. चीनमधील कापसाची व अमेरिकेतील कापूस पिकाची स्थिती याचा बाजाराला आधार आहे. तर देशातही सणामुळे मागणी वाढत आहे. यामुळे कापूस दरात चालू महिन्यात किमान पाचशे रुपयांची सुधारणा दिसू शकते. असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.