
जिल्ह्यातील पशुपालकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. पशु किसान क्रेडिट कार्ड हे बंधनकार केले आहे . आतापर्यंत पुणे जिल्ह्यातील पशु किसान क्रेडिट कार्ड साठी 2039 शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून ,जास्तीत जास्त पशुपालकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आव्हान पुणे जिल्ह्याचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर विष्णू गर्जे यांनी केले आहे. देशातील पशुपालकांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार विविध योजना राबवते. देशातील शेतकऱ्यांसाठी भारत सरकारने आता पशु किसान क्रेडिट कार्ड योजनेची सुरुवात केली आहे . या योजनेमध्ये सर्व पशुपालकांना व्यवसाय वाढविण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे . या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एक लाख साठ हजार रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध होणार आहे . ते फक्त चार टक्के व्याजदराने मिळणार आहे.
पशु किसान क्रेडिट कार्ड योजना काय आहे?
◼️ ज्या शेतकऱ्यांकडे गाई, म्हैस ,बकरी आणि कोंबड्या आहेत. अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
◼️मत्स्य व्यवसाय करणाऱ्यांनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
◼️पशुपालन आणि मत्स्य पालनात प्रोत्साहन देऊन त्याला उभारी देण्याचा या योजनेचा उद्देश आहे.
◼️केंद्र सरकार या योजनेसाठी पशुपालकांना एक लाख साठ हजार रुपये कर्ज उपलब्ध करून देणार आहेत.
◼️कर्जासाठी काहीही तारण ठेवण्याची गरज नाही.
योजनेचे प्रमुख उद्दिष्टे?
◼️पशु किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत पैशाच्या अभावी शेतकऱ्यांची किंवा पशुपालकांची जनावर आजारी पडल्यास पैसे अभावामुळे गरीब पशुपालकांना त्यांच्या पशु वर उपचार करता येत नाहीत.
◼️अशा परिस्थितीत पशु किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत या शेतकऱ्यांना शासनाकडून मदत केली जाईल.
◼️पशुपालक शेतकऱ्यांनाही पशुपालनास प्रोत्साहन मिळावे यासाठी पशुपालक क्रेडिट कार्ड योजना सुरू केली आहे.
◼️पशुसंवर्धन आणि देशातील पशुधनाची स्थिती सुधारणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट असणार आहे.
आवश्यक पात्रता ?
◼️ पशुपालक क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ हा देशातील सर्व पशुपालक शेतकऱ्यांना घेता येणार आहे.
◼️ ज्या शेतकऱ्याकडे शेत जमीन कमी आहे .अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
◼️ ज्या शेतकऱ्यांकडे स्वतःच्या मालकीची जमीन नाही.
◼️ जे शेतकरी गाई म्हैस बकरी पालन करतात.
◼️ अशा सर्व शेतकरी आणि पशुपालकांना या योजनेअंतर्गत लाभ घेता येणार आहे.
लाभ काय असणार आहे?
◼️पशु किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत कोणतेही शेतकरी एखाद्या गाईचा पाठपुरावा करत असेल तर त्यांना प्रति गाय रुपये 12000 देण्यात येणार आहेत.
◼️ तसेच म्हशी पालन करणाऱ्या पशुपालक शेतकऱ्यास पशु किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत प्रत्येक म्हशीला चौदा हजार रुपये देण्यात येणार आहेत.
◼️ जर पशुपालक शेतकऱ्यांनी शेळीचे पालन केले असेल तर त्याला शेळी गट साठी वीस हजार रुपये देण्यात येतील.
अर्ज कुठे करायचा?
पशुपालकांना बँकेतून क्रेडिट कार्ड ची सुविधा देऊन लाभ देण्यात येतो. त्यासाठी इच्छुक लाभार्थी पशुपालक शेतकऱ्यांना ऑफलाइन बँकेमार्फत पशुपालक क्रेडिट कार्ड साठी अर्ज करावा लागेल.
क्रेडिट कार्ड साठी आवश्यक कागदपत्रे?
◼️ आधार कार्ड
◼️पॅन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र
◼️बँक खात्याचे तपशील
◼️पासपोर्ट आकाराचा फोटो
◼️ रेशन कार्ड