देशात ऊस गळीत हंगामाला नुकतीच सुरुवात झाली आहे. यावर्षी उसाच उत्पादनही घटून साखर उत्पादनही कमी राहण्याचे भाकीत केले जात होते . महाराष्ट्रातील ऊस उत्पादन घटण्यामागील अनेक कारणांपैकी खोडवा पिकाच कमी उत्पादन हे प्रमुख कारण आहे . उसाचे सरासरी उत्पादन वाढवण्यासाठी खोडवा ठेवताना कोणती काळजी घ्यायची? राज्यातील एकूण क्षेत्रापैकी 35 ते 40 टक्के खोडव्याचे क्षेत्र असूनही एकूण उत्पादनात खोडव्याचा हिस्सा फक्त तीस ते पस्तीस टक्के इतकाच आहे. म्हणून लागणीच्या ऊसाप्रमाणेच खोडव्याचे उत्तम व्यवस्थापन केले पाहिजे. त्यासाठी पंधरा फेब्रुवारीपर्यंत तुटलेल्या उसाचाच ठेवावा
खोडवा त्यानंतर घेतलेल्या खोडवा उसावर खोडकिडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो. ज्या ऊस लागवडीच्या उसाचे उत्पादन हेक्टरी १०० टन आणि उससंख्या एक लाखापेक्षा जास्त आहे अशा उसाचा खोडवा ठेवावा . ऊस पिक विरळ झाल्यास 45 सेंटिमीटर पेक्षा जास्त अंतरावरील नांग्या भरण्यासाठी प्लास्टिकच्या ट्रे मध्ये तयार केलेली किंवा ऊस रोपवाटिकेतील रोपे दुसऱ्या पाण्याच्या वेळी लावावीत.
खोडवा ठेवण्याची जमीन सुपीक आणि निचऱ्याची असावी. खोडवा पीक 12 ते 14 महिने वयाचे असताना उसाची तोड होणार असेल तरच खोडवा ठेवा, शिफारस केलेला ऊस जातीचा खोडवा ठेवावा.
खोडवा नेमका कोणत्या वेळी राखायचा.
ऊसाची तोडणी ऑक्टोबर पासून एप्रिल मे पर्यंत केली जाते या उसाचा खोडवा ठेवला जातो. जसं जसं खोडवा राखण्यासाठी उशीर होतो तसतसे खोडव्याचे उत्पादनही कमी होत जाते ,म्हणून 15 फेब्रुवारी नंतर तोडलेल्या उसाचा खोडवा ठेऊ नये. संशोधनानुसार सप्टेंबर ते ऑक्टोबर या कालावधीत तुटलेल्या उसाचा खोडवा ठेवल्यास जास्तीत जास्त उत्पादन मिळते . पूर्व हंगामी ऊसापासून ठेवलेल्या खोडव्याचे जास्त उत्पादन मिळते.
खोडवा ठेवताना कोणती काळजी घ्यायची.
खोडवा ठेवताना पाचट जाळू नये, पाचट शेता बाहेर न टाकता एक आड एक सरीतही ठेवू नये. याशिवाय तोडलेल्या उसाच्या बुडख्यांवर पाचट ठेवू नये . खोडवा ऊसाला रासायनिक खते फेकून देऊ नयेत. आंतरमशागत व मोठी बांधणी करणे.बदला फोडून, जारवा तोडण ही कामे करणही टाळाव. तसेच पाण्याचा हाती वापरही टाळावा खोडवा ठेवताना अशी काळजी घेतली तर खोडवा ऊसापासूनही चांगले उत्पादन मिळते