विदर्भ आणि मराठवाड्यात आज गारपिटीचा इशारा; बुलढाणा, अकोला, वाशिम जिल्ह्यांत “ऑरेंज अलर्ट”

उत्तर महाराष्ट्र सह राज्याच्या विविध भागात हलक्या ते मध्यम  पावसाने हजेरी लावली आहे.  नाशिक जिल्ह्यात जोरदार पावसासह तुरळक  ठिकाणी गारपीट झाली आहे.  आज विदर्भ मराठवाड्यात जोरदार पावसासह गारपीटीचा इशारा देण्यात आला आहे.  तर उर्वरित राज्यात जोरदार वारे विजांसह पावसाची शक्यता कायम असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

नैर्ऋत्य अरबी समुद्रापासून सौराष्ट्र आणि कच्छ परिसरावर असलेल्या चक्राकार वाऱ्यांपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.  उत्तर मध्य प्रदेश आणि परिसरावरही चक्राकार दक्षिण अंदमान समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार होत असून या वाऱ्याच्या प्रभावामुळे आज (दिनांक 27)  या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची, तसेच उद्यापर्यंत (ता. २९) त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.

रविवारी उत्तर महाराष्ट्र सह राज्याच्या विविध भागात मेघ गर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस झाला.  नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात तुरळक ठिकाणी गारपीट झाले . आज 27 विदर्भातील ,बुलढाणा, अकोला वाशिम या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा गारपीटीचा ऑरेंज अलर्ट तर मराठवाड्यातील जालना, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये विजांसह पाऊस, गारपिटीचा ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे.  कोकणमध्ये महाराष्ट्र मराठवाड्यात विदर्भात जोरदार वारे विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. कमाल तापमानात ढगाळ हवामानामुळे घट झाली असून किमानातही वाढ कायम आहे.  विदर्भात मात्र गारठा वाढल्याचे चित्र आहे.

गारपिटीसह, मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :

बुलडाणा, अकोला, वाशिम.

गारपीट, पावसाचा इशारा (येलो अलर्ट):

जालना, परभणी, हिंगोली.

जोरदार वारे, विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट):

सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर,पालघर, ठाणे, रायगड, नाशिक, जळगाव, नगर, बीड, नांदेड, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोलीअमरावती, यवतमाळ, वर्धा, .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *