मागच्या वर्षी देशातील अनेक ठिकाणी सामान्य पेक्षा कमी पाऊस पडला होता. कमी पावसामुळे अनेक भागांमध्ये दुष्काळ पडला होता. पावसाचा परिणाम खरीप पिकानंतर रब्बी पिकांवर झाला होता. आता या वर्षी मात्र सामान्य पाऊस होणार आहे.काही दिवसांपूर्वी आशिया-पॅसिफिक इकॉनॉमिक को-ऑपरेशनच्या (अपेक) या संस्थेने वर्तवलेल्या अंदाजानंतर स्कायमेटने आपला अंदाज वर्तवलेला आहे.या वर्षीचा पाऊस देशभरामध्ये सामान्य असणार आहे असे स्कायमेटने सांगितले आहे. या अगोदर सामान्य पावसाचा अंदाज 12 जानेवारी 2024 रोजी स्कायमेटने सांगितला होता.
‘ला-निना’ची परिस्थिती..
मागील वर्षी ‘एल-निनो’चा पावसावर परिणाम होता. मात्र ‘एल-निनो’ची परिस्थिती आता निवळली आहे. आता ‘ला-निना’ची परिस्थिती निर्माण होत असल्याचे संकेत मिळाले आहेत.तसेच ला-निनाची परिस्थिती असल्यास पाऊस चांगला होत असतो . आशिया-पॅसिफिक इकॉनॉमिक को-ऑपरेशनच्या (अपेक) हवामान केंद्राने जुलै ते सप्टेंबर या कालावधीमध्ये भारतात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला आहे.
सामान्य पाऊस स्कायमेटचा अंदाज..
यंदाचा मान्सून देशभरात सामान्य राहणार आहे, असे स्कायमेटने सांगितले आहे.स्कायमेट या खासगी हवामान संस्थेचा हा दुसरा अंदाज आहे . सुरुवातीला मान्सूनचा प्रभाव कमी असणार आहे. असे स्कायमेटने म्हटले आहे , परंतु एकंदरीत जून ते सप्टेंबर या चार महिन्यांमध्ये पाऊस असणार आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांमध्ये दक्षिण भारतासह मध्य भारतात मान्सून जास्त प्रभावी असणार आहे.
”एल-निनोचे रुपांतर आता ला-निनामध्ये होत आहे,असे स्काईमेटचे मुख्य निर्देशक जतिन सिंह यांनी सांगितले आहे. यामुळे पाऊस सामान्य होईल.असा अंदाज आहे. उत्तर-पश्चिम भागात तसेच दक्षिण, पश्चिम भागांमध्ये चांगला पाऊस होणार आहे. मध्य प्रदेशात,महाराष्ट्रा मध्ये जोरदार पाऊस असणार आहे. पश्चिम बंगालमधील काही भागांमध्ये ,व बिहार, झारखंड, ओडिशा या ठिकाणी जुले ते ऑगस्ट दरम्यान कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.”
चार महिन्यांत कशी आहे शक्यता..
◼️ जून
50% सामान्य पावसाची शक्यता
20% सामान्यपेक्षा जास्त पावसाची शक्यता
30% सामान्यपेक्षा कमी पावसाची शक्यता.
◼️ जुलै
60% सामान्य पावसाची शक्यता
20% सामान्यपेक्षा जास्त पावसाची शक्यता
20% सामान्यपेक्षा कमी पावसाची शक्यता.
◼️ ऑगस्ट
50% सामान्य पावसाची शक्यता
20% सामान्यपेक्षा जास्त पावसाची शक्यता
30% सामान्यपेक्षा जास्त पावसाची शक्यता.
◼️ सप्टेंबर
60% सामान्य पावसाची शक्यता.
20% सामान्यपेक्षा जास्त पावसाची शक्यता.
20% सामान्यपेक्षा जास्त पावसाची शक्यता












