मध व्यवसाय सुरु करायचाय तर जाणून घ्या या योजनेबद्दल ,मिळेल ५०% अनुदान….

मध केंद्र योजना ही महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाकडून राबवण्यात येते . यात मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण देण्यात येते. शासनाच्या हमी भावाने मध खरेदी, साहित्य स्वरूपात ५० टक्के अनुदान,मधमाशा संरक्षण व संवर्धनाची जनजागृती, विशेष प्रशिक्षणाची सुविधा, इ सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

◼️यातील वैयक्तिक मधपाळ योजनेचा लाभ घेण्यासाठी वय अर्जदाराचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.

◼️अर्जदार साक्षर असावा.स्वतःची शेती असल्यास प्राधान्य.

◼️तर केंद्र चालक प्रगतिशील मधपाळ योजनेसाठी लाभार्थी २१ वर्षांपेक्षा जास्त वय असणे आवश्यक .

◼️किमान १० वी पास असणे आवश्यक .वैयक्तिक केंद्र चालक असावा.

◼️अशा व्यक्तींच्या अथवा कुटुंबातील कोणत्याही व्यक्तींच्या नावावर किमान एक एकर शेती किंवा भाडे तत्त्वावर घेतलेली शेतजमीन असणे आवश्यक आहे .

◼️किमान १० वर्षांसाठी भाडेतत्त्वावर घेतलेली किमान एक एकर शेतजमीन संस्थेच्या नावे असणे आवश्यक आहे.

◼️प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता, लाभार्थीकडे मधमाशापालन व सुविधा असावी.

◼️केंद्र चालक संस्था योजनेसाठी संस्था नोंदणीकृत असावी. एक हजार चौरस फूट इमारत असणे आवश्यक यासह इतर अटींचे पालन करणे आवश्यक आहे.

३० जुलैपर्यंत करता येणार अर्ज.. 

शेतकरी , कातकरी, सुशिक्षित बेरोजगार, पात्र संस्था, लाभार्थ्यांनी ३० जुलैपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन हिंगोली जिल्हा ग्रामोद्योग अधिकाऱ्यांनकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply