राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी घेण्यात आलेल्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय महायुती सरकारने घेतले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या बैठकीला उपस्थित होते येत्या काही महिन्यांत विधानसभा निवडणूक असल्यामुळे आता घेण्यात येणारी मंत्रिमंडळाची प्रत्येक बैठक ही महत्वाची मानली जात आहे . त्यामुळे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकार काय निर्णय घेणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते . राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीमध्ये एकूण 8 महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत .या बैठकीत मराठवाडा व विदर्भातील दूध उत्पादकांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे . राज्य सरकारने 149 कोटी रुपयांचा निधी विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये दुग्ध विकासाला गती देण्यासाठी मंजूर केला आहे.
8 मोठे निर्णय खालीलप्रमाणे ..
1. विदर्भ व मराठवाड्यात दुग्ध विकासाला गती देणार 149 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. (पशूसंवर्धन व दुग्धविकास)
2. मराठवाड्यातील खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय लाखो नागरिकांना लाभ ( महसूल विभाग)
3. टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना ,गोखले अर्थशास्त्र व राज्यशास्त्र संस्था, डेक्कन कॉलेज,वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना
(उच्च व तंत्र शिक्षण विभाग)
4. खासगी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या निवृत्त अध्यापाकाना ठोक मानधन(वैद्यकीय शिक्षण विभाग)
5. यंत्रमागांना अतिरिक्त वीजदर सवलतीसाठी नोंदणीची अट मार्च 2025 पर्यंत शिथील करणार (सहकार विभाग)
6. केएफ डब्ल्यू कंपनीशी सौर ऊर्जा प्रकल्पांच्या कर्जासाठी स्थिर व्याजदराने करार (ऊर्जा विभाग)
7. सहा हजार किमी रस्त्यांचे डांबरीकरणाऐवजी सिमेंट काँक्रीटीकरण. सुधारित ३७००० कोटीच्या खर्चास मान्यता देण्यात आली (सार्वजनिक बांधकाम विभाग)
8. नगराध्यक्षांचा कालावधी अडीच ऐवजी पाच वर्ष करण्यात येणार (नगरविकास विभाग)