या जिल्ह्यामध्ये वादळी वारऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीने पिकांना मोठा तडाखा..

वादळी वाऱ्यामुळे अवकाळी पाऊस आणि गारपिटीने बुलडाणा , अकोला, मराठवाड्यामधील छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यांमध्ये मोठा तडाखा दिला आहे. अवकाळी पावसामुळे हजारो हेक्टर फळबागांचे तसेच रब्बी भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गहू ,ज्वारी, बाजरी, ही पिके जमीनदोस्त झाली. चिकू ,संत्रा, आंबा बागांमध्ये फळगळ झाली. रब्बीहंगामाच्या काढणीच्या वेळेतच शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

हजारो हेक्टरवरील गहू, हरभरा, ज्वारी, कांदा पिकांसह फळबागांचे अकोला, बुलडाणा जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पूर्णा नदीच्या जवळ असलेल्या जळगाव ,नांदुरा, जामोद या तालुक्यांमधील काही गावात जोरदार पाऊस व त्या सोबतच बोरांच्या आकारांच्या गारा देखील पडल्या आहेत . त्यानंतर संध्याकाळी सगळीकडे पावसाने जोर धरला.पावसाने बुलडाणा ,अकोला जिल्ह्यातील सगळ्या तालुक्यांमध्ये या हजेरी लावली . सर्वात जास्त २८.५ मिमी पाऊस हा अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यामध्ये झाला.

तसेच मूर्तिजापूरमध्ये २५.६, बार्शीटाकळी ४.८, पातूर येथे ३.९,बाळापूर १६.८, अकोला ५.५, अकोट ३.९, पाऊस झाला. बुलडाणा जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये पाऊस पडला . त्या जिल्ह्यातील काही भागामध्ये गारपीट झाल्यामुळे नुकसान झाले. , जळगाव जामोद, संग्रामपूर,देऊळगावराजा, शेगाव,नांदुरा, तालुक्यांमध्ये गारपीट मुळे सर्वाधिक नुकसान झाले आहे. संत्राच्या बागांना संग्रामपूर तालुक्यात मोठा फटका बसला. वादळी वाऱ्यामुळे सुनगावमध्ये झाडे पडली आहे.

या गारपिटीमुळे एकलारा भागामधील टरबूज-खरबूज या पिकांच्या वेलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ज्वारी पिकाचे नुकसान झाले आहे. ज्वारी उत्पादनावर याचा मोठा फटका बसणार आहे . या नुकसानी नंतर , शेगाव तालुक्यात रविकांत तुपकर यांनी मंगळवारी (ता. २७)पाहणी केली. नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात येतील व शेतकऱ्यांना १०० टक्के भरपाई देण्याची मागणी केली यांनी केली .

बुलडाण्यातील व अकोल्यातील स्थिती.

– रब्बी ज्वारीचे,गहू, मका, पिकांचे नुकसान

– काढणीसाठी तयार असलेला हरभरा भिजला

– संत्रा बागांमध्ये फळगळती.

– टरबूज, खरबूज शेतीलाही तडाखा, वेल तुटले
जालना, संभाजीनगर जिल्ह्यांतही तडाखा

– कांदा पिकाची पात मोडून पडली

– कांदा बीजोत्पादन क्षेत्रात गेंद तुटले

– पपईच्या बागांमध्ये झाडे तुटली

– मोहरलेल्या, फळे लागलेल्या आंब्याचे नुकसान

जालना जिल्ह्यामधील जाफराबाद अंबड, भोकरदन, गोंदी, वडिगोद्री, टेंभुर्णी शहागड, अंकुशनगर, व पारधसह इतर काही गावांमध्ये संध्याकाळी वादळी वाऱ्यासह व विजांसह अवकाळी पाऊस पडला .

जाफराबाद तालुक्यातील आंबेगाव टेंभुर्णी, गणेशपूर, काळेगाव, गोंदन खेडा, नळविहीरा, तपोवन आदी ठिकाणी तसेच भोकरदन तालुक्यातील सावंगी अवघडराव, सेलूद, गव्हाण संगमेश्वर, पिंपळगाव कोलते, सुरंगळी सजा वाकडी ,पिंपळगाव बारव, नळणी बु. सजा, ठिकाणीही गारपीट व वादळी पाऊस झाला.

घरांवरील पत्रे वादळामुळे काही उडाले. शेतकऱ्यांची त्यामुळे धांदल उडाली.वादळी पावसाचा व गारपिटीचा फटका रब्बीतील हरभरा, ज्वारी, गव्हासह फळ पिकातील पपई, आंबा, चिकू आदी पिकांना बसला.

छत्रपती संभाजीनगर तालुक्यामधील ,सिल्लोड , फुलंब्री, कन्नड, तालुक्यातील काही गावांत वादळी वाऱ्यासह तुरळक पाऊस झाला. सायगव्हाण ,नागद,पिरबावडा, नागापूर, माणिकनगर, आळंद, परिसरात काही ठिकाणी तुरळक गारा व वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.
वीज पडून बैलाचा मृत्यू फुलंब्री तालुक्यातील धानोरा येथे झाला.

या जिह्यांमधील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी जालन्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ मंगळवारी सकाळीच प्रत्यक्ष बांधावर दाखल झाले होते . जिल्हाधिकाऱ्यांनी जाफराबाद तालुक्यामधील तपोवन (गोंदन),टेंभुर्णी,गणेशपूर आंबेगाव,आदी ठिकाणी प्रत्यक्ष रित्या पाहणी केली आहे. प्रशासनाकडून अवकाळीने नुकसान झालेल्या भागात तलाठी, कृषी सहायक ,ग्रामसेवक यांचे पथक स्थापन करण्यात येऊन अंतिम अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

भोकरदन तालुक्यामधील वीज कोसळून दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यामध्ये एक शेतकरी महिला आहे. शिवाजी गणपत कड (वय ३८, रा. सिपोरा बाजार) व अर्चना (पल्लवी)विशाल दाभाडे (२१, रा. कुंभारी) अशी मृतांची नावे आहेत.

 

Leave a Reply