सरपंच-उपसरपंचाच्या मानधनात वाढ,आता त्यांना मिळणार इतके मानधन..

शासनाने सरपंच व उपसरपंचाच्या मानधनात दुप्पट वाढ केली आहे. आता सरपंचांना १० हजार रुपयांपर्यंत मानधन मिळणार आहे. याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. राज्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंचांना आधी खूप कमी मानधन दिले जात होते .

त्यामुळे मानधनात वाढ करण्यात यावी , अशी मागणी राज्यभरातील सरपंच संघटनांकडून करण्यात येत होती . गावाचा कारभार सांभाळणारे सरपंच, उपसरपंच यांच्या मानधनात वाढ करावी म्हणून कित्येक वर्षांपासून ही मागणी करण्यात आली होती .

वाढीव मानधन

 सरपंचांसह उपसरपंचांना देखील मानधन वाढवून मिळण्यासाठी अनेक दिवसांपासून मागणी करण्यात येत होती. आता सरपंचांसह उपसरपंचांना हे मानधन वाढवून मिळणार असल्याने दिलासा मिळाला आहे.

सरपंच हे अतिशय महत्त्वाचे पद आहे. राज्य शासनाने सरपंच आणि उपसरपंच पदाला साजेशे मानधन देणे गरजेचे आहे. मानधन जरी वाढवले असले तरी जबाबदारीच्या तुलनेमध्ये हे मानधन खूपच कमीच आहे. यापेक्षा जास्त वाढीची गरज आहे. २० ते २५ लाखांपर्यंत विकासकामे मंजूर करण्याचा अधिकार सरपंचांना देण्यात यावा .
– नंदू भोपी, अध्यक्ष, अखिल भारतीय सरपंच परिषद, रायगड.

सरपंच, उपसरपंचांचे मानधन दुप्पट..

● आठ हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सरपंचाला १० हजार रुपये मानधन दिले जाणार आहे.पूर्वी ५ हजार मानधन होते

● उपसरपंचांना ४ हजारांपर्यंत सरपंचाच्या तुलनेत उपसरपंचाला निम्मे मानधन आहे. ८ हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असेल तर ४ हजार रुपये मिळतील.

● जबाबदारीच्या मानाने कमी मानधनः सरपंच व उपसरपंच हे अतिशय महत्त्वाचे पद आहे. त्यामुळे या पदाला शोभेल इतके मानधन मिळणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *