देशातील बाजारात कापसाचे दर दबावातच, त्यातच कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया कापूस उत्पादनाच्या अंदाजात वाढ केली. सध्या देशातील कापूस लागवड पिछाडीवर महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश ,पंजाब या महत्त्वाच्या राज्यांमध्ये कापूस लागवड कमी दिसते. तर सध्या कापसाला सरासरी सहा हजार पाचशे ते सात हजार दोनशे इतका दर मिळत आहे.
. देशातील बाजार तुरीचे भाव तेजीतच आहे. आफ्रिकेतील तूर पुढील महिन्यात बाजारात येईल, पण देशात तूर लागवड जास्त प्रमाणा मध्ये झाली नाही. देशात तूर लागवड क्षेत्र मोठ्या प्रमाणात पिछाडी वर आहे. बाजारात तुरीचे भाव तेजीत राहण्याचा अंदाज आहे .
सध्या तुरीला प्रतिक्विंटल सरासरी नऊ हजार ते 10 हजार तीनशे रुपये भाव मिळतो. तूर बाजारातील अभ्यासकांनी सांगितले ,हे दर भविष्यातही असेच राहतील.
देशातील बाजारात हरभरा भाव दबावातच. हरभरा हमीभावा पेक्षा कमी दरात विकला जातो . दुसरीकडे बाजारातील आवक कमी झाली, तसेच गुणवत्तापूर्ण मालाची टंचाई सुद्धा झाली .तेव्हा काहीशी सुधारणा झाली, प्रतिक्विंटल सरासरी 4500ते 5000 शंभर रुपयांच्या दरम्यान भाव मिळतो.
सरकारकडे यंदा मोठ्या हरभरा स्टॉक आहे. तसेच सरकार हा स्टॉक बाजारात विकते.त्यामुळे हरभऱ्याचे भाव फार वाढतील असे वाटत नाही.असेही जाणकारांनी सांगितले तर भाजीपाला प्रमाणे हिरव्या मिरचीचे दर तेजीत आहे. देशातील महत्त्वाच्या बाजारांमध्ये हिरव्या मिरचीची आवक सरासरी पेक्षा निम्म्याने कमी दिसते . त्यामुळे हिरव्या मिरचीला प्रति क्विंटल सरासरी पाच हजार ते सहा हजार रुपयांच्या दरम्यान भाव वाढण्याची शक्यता ,त्यामुळे मिरचीच्या दरातील तेजी कायम राहण्याचा अंदाज आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोयाबीनच्या वाणामध्ये चांगली सुधारणा झाली. सोयाबीन सोबतच सोयाबीन पेंड च्या दरातही वाढ झाली आहे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सोयाबीन व सोयाबीनपेंड दरात वाढ कायम राहिली, तर देशातही दर सुधारू शकतात. भारताचा सोयाबीन बाजार हा प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतो आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीन पेंडच्या दरात वाढ झाल्या नंतरच देशातही सुधारणा दिसून येते परंतु देशातील खाद्यतेल बाजारावर मोठा दबाव आहे
सोयाबीनच्या दरात कालपासून सुधारणा सुरू आज वायदे बाजारातील आठवड्याचा शेवटचा दिवस असल्याने दरात जास्त चढ उतार दिसत आहे. मागील अनेक आठवड्यामध्ये ही स्थिती पाहायला मिळाली . सोयाबीनचे 13.4 डॉलर प्रतिभूषषे होते . यांनी तर आज 402 डॉलर प्रति टनांचा टप्पा गाठला आता आठवड्याचा शेवट असल्याने बाजारात किती वाढ होते. हे पाहावे लागेल ,सोयाबीनला सरासरी 4500 ते 5000 रुपये भाव मिळतो. सरकारचे खाद्यतेल धोरण आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती पाहता सोयाबीन स्थिर राहण्याचा अंदाज आहे. पण यंदा देशातील अनेक सोयाबीन उत्पादन भागात पुरेसा पाऊस नाही. सोयाबीनची लागवड महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पिछाडीवरआहे.
मध्य प्रदेशातील पेरा ही कमी राहील पेरणीचा काळ आता संपल्यात जमा आहे. यंदा सोयाबीनची लागवड कमी राहील असे संकेत मिळतात . उत्पादनाबाबत ही निश्चित सांगता येत नाही पण देशातील लागवड कमी राहील असे सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केले .