अंधश्रद्धेतून शेतकऱ्यांनी पाठ फिरवलेला मालेगावचा शेवगा, कसा पोहोचला बांगलादेशात ? पहा सविस्तर

अंधश्रद्धेतून शेतकऱ्यांनी पाठ फिरवलेला मालेगावचा शेवगा कसा पोहोचला बांगलादेशात पहा सविस्तर

कमी पाण्यामध्ये हामकास येणारे पीक म्हणून शेवगा ओळखला जातो. शेवगा आता दुष्काळी भागांना साठी वरदान ठरू लागला आहे. मालेगाव तालुक्याच्या माळमाथासह कळवण, सटाणा, देवळा, तालुक्यात दरवर्षी या पिकाच्या लागवडी क्षेत्रात दिवसेंदिवस वाढ होत आहे. या परिसरातील शेवगा आता थेट बांगलादेशासह भूतान या देशातही निर्यात होऊ लागला आहे.त्यामुळे  उत्पादन करणारे शेतकऱ्यांमध्ये समाधान चे वातावरण निर्माण झाले आहे.

शेतकऱ्यांची अशी होती अंधश्रद्धा.

चिचावड तालुक्यामधील एका शेतकऱ्याने 2009 साली शेवग्याची लागवड केली होती. कारण पूर्वी अंधश्रद्धेमुळे शेवगा कोणी लावत नव्हते, दारात शेवगा असला तरी वावगे समजले जायचे परंतु यात शेतकऱ्याचा हा प्रयोग कमालीचा यशस्वी ठरला ,शेवग्याला त्यावर्षी 125 ते 155 रुपये किलोचा दर होता.  विशेष म्हणजे तो बाहेरच्या राज्यातही जाऊ लागला . त्यानंतर आजूबाजूच्या शेतकऱ्यांमध्ये शेवग्याची चांगलीच क्रेझ निर्माण झाली. 2014-15 पासून शेतकऱ्यांनी शेवग्याकडे उत्पादनाचे साधन म्हणून पाहू लागले.  हळूहळू शेवग्याच्या क्षेत्रात वाढ होऊ लागली. 2015 ते 17 मध्ये मालेगाव मार्केटमध्ये शेवगा येऊ लागला हा माल घ्यायला वाशीचे व्यापारी येतात .2018 पासून मालेगाव तालुक्यात शेवग्याची लागवड क्षेत्र वाढले हा माल बिहार उत्तर प्रदेश दक्षिण भारतातून व्यापारी येऊ लागले.

पाऊस नसल्याने वाढला सीझन

शेवगाचा सीजन हा दिवाळी ते मे महिन्यापर्यंत असतो परंतु यंदा पाऊस लांबल्यामुळे पंधरा दिवस तरी शेवगा मार्केटमध्ये उपलब्ध राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. दोनदा फळ येते एका एकदा कटिंग झाल्यानंतर पुन्हा नवीन माल येतो व दोन महिने चालतो

मध्यम शेवग्याला डिमांड

व्यापारी शेवगा घेत असताना, निर्यात करत असताना चोखळतपणे निवड करतात यात शेवग्याची लांबी, जाडी, रंग पाहिले जातात 22 ते 28 इंची पर्यंत शेवग्याची उंची असते .आपल्याकडील ग्राहक, व्यापारी मध्यम प्रकारचे शेवग्याला पसंती देतात .इतर ईशानी भारतात मात्र अत्यंत कमी बारीक असलेल्या शेवग्याला नागरिक पसंती देतात.

कॅल्शियम कंपन्यांमध्ये मागणी

शेतकऱ्यांबरोबर कॅल्शियमच्या कंपनीने जास्त प्रमाणात लागतो.  डाळिंब व इतर फळ पिकांपेक्षा अधिक पैसे मिळत असल्याने शेवग्याचे क्षेत्र हळूहळू वाढले. तसेच पाल्यापासून पावडर करत तिचा कॅल्शियम म्हणून वापर केला जातो. त्यामुळे केमिकल कंपन्यांकडूनही शेवग्याला चांगली मागणी आहे. पीक शेतकऱ्यांच्या हक्काचे पीक झाले आहे . अत्यंत कमी पाण्यात हमखास हे पीक येते.  माळमाथ्यावर चांगली लागवड केली जाते.  ग्राहकांबरोबरच बाहेरही इतर देशांमध्ये राज्यांमध्ये मालेगावचे शेवग्याला चांगलीच मागणी आहे. 

शेवग्यासाठी फक्त मालेगावलाच मार्केट

शेवग्याचे लिलाव होणारे मार्केट फक्त मालेगावलाच आहे त्यामुळे अनेक शेतकरी व्यापारी तिथे येतात जळगाव चोपडा कुसुंबा नेर साक्री नंदुरबार सहम उत्तर महाराष्ट्रातून येथे शेतकरी माल आणतात आयुर्वेदात शेवग्याला महत्त्व आहे. उष्ण गुणधर्म असलेला शेवगा कफ व वात कमी करतो. शरीरातील उष्णता वाढवतो.  कफाच्या आजारावर गुणकारी आहे . शेवग्याच्या पानाची वाफ विविध आजारांवर दिली जाते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *