मराठवाड्यातील ‘या’ जिल्ह्यांना दिला हवामान विभागाने यलो अलर्ट ; दमदार पाऊस होण्याची शक्यता.

मराठवाड्यातील 'या' जिल्ह्यांना दिला हवामान विभागाने यलो अलर्ट ; दमदार पाऊस होण्याची शक्यता.

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात ठीक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. याच दरम्यान मराठवाड्यात देखील गेल्या दोन-तीन दिवसात अनेक भागात पाऊस आणि कमी -जास्त प्रमाणात हजेरी लावत आहे. तर आता मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांना हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. हिंगोली ,परभणी ,लातूर, नांदेड ,धाराशिव या जिल्ह्यांना दमदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच काही जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी बरसतील .मराठवाड्यात म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. मात्र अजूनही मोठ्या पावसाची अपेक्षा आहे. 

गेल्या तीन ते चार दिवसापासून मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. कुठे रिमझिम तर कुठे दमदार पाऊस पडताना पाहायला मिळत आहे .त्यामुळे पिकांना आधार मिळाला आहे. परंतु असे असले तरी मराठवाड्यातील अनेक ठिकाणी पावसाचा खंड आहे. त्यामुळे आगामी काळात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. अशा परिस्थितीतच मराठवाड्यात अजूनही मोठ्या पावसाची अपेक्षा आहे.

मराठवाड्यातील आत्तापर्यंतचा पाऊस

जिल्हा गतवर्षी यावर्षी 24 तासांत पाऊस 
औरंगाबाद 301 मिमी 90 मिमी03.4 मिमी
जालना 365 मिमी203 मिमी2.60 मिमी
परभणी 386 मिमी193 मिमी00 मिमी
नांदेड 370 मिमी262 मिमी3.05 मिमी
हिंगोली 524 मिमी243 मिमी03 मिमी
बीड 667 मिमी172 मिमी0.1 मिमी
धाराशिव 302 मिमी129 मिमी1.9 मिमी
लातूर 384 मिमी222 मिमी4.6 मिमी

कोकणघाट घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा.

मॉन्सून सक्रिय असल्यामुळे कोकण घाट मध्ये मुसळधार ते अति जोरदार पावसाचा इशारा आहे. ठाणे ,पालघर, रायगड, पुण्याच्या घाटमाथ्यावर रेड अलर्ट तर मुंबई, रत्नागिरी आणि साताऱ्याच्या घाट मध्यावर ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

तर नंदुरबार ,सिंधुदुर्ग नाशिक ,कोल्हापूर, अमरावती, वर्धा, नागपूर ,भंडारा, या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा यलो अलर्ट करण्यात आलेला आहे . उर्वरित विदर्भात विजासह पावसाचा तर उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज.

अति जोरदार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) :

पालघर, पुणे,ठाणे, रायगड, 

जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :

मुंबई, रत्नागिरी, सातारा.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

कोल्हापूर, अमरावती,नागपूर, सिंधुदुर्ग, वर्धा, नंदूरबार, नाशिक, भंडारा ,

विजांसह पावसाचा इशारा (यलो अलर्ट) :

बुलढाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *