किसान मानधन योजना व PM किसान या दोन्ही योजनांचा एकत्रीत लाभ शेतकऱ्यांना मिळू शकतो का? या दोन्ही योजना नेमक्या काय?

शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार विविध योजना राबवत असते . शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा हेच या मागचे उदिष्ट् आहे. यातीलच पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना आणि दुसरी किसान मानधन योजना. या दोन योजना आहेत .दोन्ही योजना नेमक्या काय आहेत ? शेतकऱ्यांना या दोन्ही योजनांचा एकत्रीत लाभ मिळू शकतो का? या याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊयात .

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना..

सरकार देशातील शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना राबवत असते . सरकार शेतकऱ्यांना या योजनांच्या माध्यमातून आर्थिक मदत करत असते . यातीलच सरकारने सुरु केलेली एक योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना.सरकार शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून वर्षाला 6000 रुपयांचा निधी देते. प्रत्येक चार महिन्याला हा निधी 2000 रुपयांचा हप्यात दिला जातो. 12 सप्टेंबर, 2019 रोजी या योजनेची सुरुवात झाली होती. आत्तापर्यंत 16 हप्ते या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. आता 17 वा हप्ता कधी मिळणार याची शेतकरी वाट बघत आहेत .

प्रधानमंत्री किसान मानधन योजना..

प्रधानमंत्री किसान मानधन योजना हि शेतकऱ्यांसाठी महत्वाची योजना आहे . ही एक पेन्शन योजना आहे. या योजने अंतर्गत 19,48,871 शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. यामध्ये 7.41 लाख महिला शेतकरी तर 12.8 लाख पुरुष आहेत.60 वर्षानंतर शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून दरमहा 3000 रुपये मिळतात. दरमहा 55 ते 200 रुपयांची रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागणार आहे.ही रक्कम वयाच्या 60 वर्षापर्यंत भरावी लागणार आहेत .

एकाच वेळी दोन योजनेचा लाभ मिळू शकतो..

दरम्यान, पीएम किसान सन्मान निधी योजनेत तुम्ही नोंदणी केली असेल तर थेट मानधन योजनेत तुम्हाला सामील होता येते . तुम्ही या दोन्ही योजनेचा एकाच वेळी लाभ घेऊ शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *