
संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेने (FAO) २०२५ साठी जागतिक धान्य उत्पादनाचा नवीन अंदाज जाहीर केला असून, एकूण उत्पादन २९७.१ दशलक्ष टनांपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवली आहे. ही वाढ मागील वर्षाच्या तुलनेत ३.८% अधिक असून, २०१३ नंतरची सर्वात मोठी वार्षिक वाढ मानली जात आहे.
FAO च्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलियात गहू, अमेरिकेत मका आणि भारतात तांदूळ उत्पादनात लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा आहे. भारतात खरीप हंगामात पेरणीचा वेग वाढल्यामुळे तांदळाचे उत्पादन १.६ दशलक्ष टनांनी वाढण्याची शक्यता आहे. पाकिस्तानमध्ये पुरामुळे उत्पादन घटले असले तरी भारताची भर ही तूट भरून काढेल.
जागतिक साठा आणि वापर २०२५-२६ मध्ये जागतिक धान्य वापर २९३० दशलक्ष टनांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. यामुळे मानवी वापर आणि प्राण्यांच्या खाद्यासाठी मुबलक पुरवठा उपलब्ध होईल. २०२६ अखेरीस जागतिक साठा ९००२ दशलक्ष टनांवर पोहोचू शकतो. तांदळाचा साठा विक्रमी उच्चांक गाठण्याची शक्यता असून, साठा-वापर गुणोत्तर ३०.६% वर स्थिर राहण्याची अपेक्षा आहे.
आंतरराष्ट्रीय व्यापारातील बदल जागतिक धान्य व्यापार दरवर्षी २.५% वाढून ४९७.१ दशलक्ष टनांवर पोहोचण्याचा अंदाज आहे. गहू व्यापारात वाढ झाली असली तरी आशिया आणि आफ्रिकेतील मागणी कमी झाल्यामुळे तांदळाच्या आंतरराष्ट्रीय व्यापारात घट होण्याची शक्यता आहे. स्थानिक कापणी चांगली झाल्यामुळे अनेक देशांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली आहे.
गव्हाचे उत्पादन २०२५ मध्ये जागतिक गव्हाचे उत्पादन ८०९.७ दशलक्ष टन होईल असा अंदाज आहे, जो मागील महिन्याच्या तुलनेत ०.६% आणि २०२४ च्या तुलनेत १.३% अधिक आहे. ऑस्ट्रेलियात अनुकूल पावसामुळे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे, जरी अंदाज पाच वर्षांच्या सरासरीपेक्षा कमी आहे.