जमीन हा आजच्या घडीला खूपच महत्वाचा मुद्दा आहे. रोजच जमीनीबाबतची नवनवी प्रकरणे न्यायालयामध्ये पाहायला मिळतात. जमिनीच्या छोट्या छोट्या हिस्स्यावरून वाद झाल्याचे काही नवीन नाही. अशावेळी काही शेतकरी जमीन मोजणीला प्राधान्य देत असतात . त्यामुळे जमीन कुठपासून कुठपर्यंत हे मोजणीच्या आधारे कळत असते . याच अनुषंगाने काय काय कागदपत्र लागतात, जमीन मोजणीसाठी अर्ज कसा करायचा, आणि शुल्क किती लागते हे यातून पाहणार आहोत.
अर्ज कसा भरायचा, ते पाहुयात…
🔰 सर्वात अगोदर सरकारच्या https://emojni.mahabhumi.gov.in/emojni/mojani/pgLogin.aspx या वेबसाईटवर अर्जाचा नमुना उपलब्ध आहे.
🔰 इथून तुम्ही डाऊनलोड करू शकता.
🔰 मोजणीसाठी अर्ज असे यावर ठळक अक्षरात लिहिलेले आहे.
🔰 यानंतर आपला तालुका, जिल्हा त्यावर भरायचा आहे .
🔰 आपले संपूर्ण नाव, गाव, पिनकोडसहित मोबाईल नंबर खालील रकान्यात टाकावा.
🔰 त्यानंतर खालील रकान्यात मोजणी करण्यासंबंधीची माहिती,शेतीचा गट, मोजणीचा प्रकार, गाव, वार्ड नंबर नमूद करणे गरजेचे असते.
🔰 त्यानंतर मोजणी फीची रक्कम नमूद करावी, चलन पावती नंबर भरावा . तसेच ७/१२ उताऱ्याप्रमाणे सहधारकांची नावे टाकावीत.
🔰 त्यानंतर लगतचे कब्जेदार, त्यांचे नाव, पत्ता टाकावा . जसे की पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर..
🔰 अर्ज, मोजणी फी चलन, ३ महिन्याची मिळकत पत्रिका, ३ महिन्या आतील ७/१२ अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांचे तपशील द्यावेत…
🔰 अर्जाच्या शेवटी अर्जदाराचा सही किंवा अंगठा द्यावा…
तुम्ही आपल्या स्थानिक तहसीलदार किंवा तालुका कार्यालयात शेत मोजणीसाठी जाऊन अर्ज करू शकता. तसेच सरकारच्या https://emojni.mahabhumi.gov.in/ या वेबसाईटवर या अर्जाचा नमुनाउपलब्ध आहे. किंवा थेट इथूनही डाउनलोड करू शकता.