जमीन मोजणीची नोटीस आता ई चावडीवर उपलब्ध , त्यामुळे आता तक्रारींना वाव राहणार नाही..

भुमिअभिलेख विभागाने ई चावडी या डिजिटल नोटीस बोर्डावर जमीन मोजणीची नोटीसही उपलब्ध करून दिल्या आहेत .  जमिनीची मोजणी कधी आहे याची माहिती नागरिकांना घरबसल्या मिळणार आहे.

तलाठी कार्यालय म्हणजे चावडी यावर महसूल विभागाच्या महत्त्वाच्या नोटीस प्रसिद्ध कराव्या लागतात . यापूर्वी या नोटीस चावडीवरच लावल्या जात त्यामुळे चावडीला विशेष महत्त्व आहे.चावडीवरील नोटीस ची माहिती सर्व नागरिकांपर्यंत पोहोचावी यासाठी भूमी अभिलेखन विभागाने फेरफार प्रकल्पांतर्गत चावडी हा प्रकल्प हा डिजिटल नोटीस बोर्ड प्रसिद्ध केला आहे.

जमीन मोजणीसाठी अर्ज केल्यानंतर संबंधित जमीन लगतच्या शेतकऱ्यांनाही भूमि अभिलेख विभागाकडून नोटीस प्रमुख्याने पोस्टाने पाठवण्यात येतात अनेक वेळा नोटीस वेळेवर मिळाल्या नाहीत.  नोटीस घरी आल्याच नाही ? किंवा भूमी अभिलेख विभागाने नोटीस पाठवलीच नाही ? अशा तक्रारी करण्यात येतात. या कारणांवरून मोजणीवरून शेतकऱ्यांकडून हरकत नोंदवण्यात येते.  त्यामुळे मोजणी लांबणीवर पडते , ई चावडीमध्ये आता मोजणीची नोटीस प्रसिद्ध होत असल्याने अशा तक्रारींना वाव राहणार नाही , असा दावा भूमी अभिलेख विभागाने केला आहे.

अशी पाहता येईल नोटीस? 

https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/aaplichawdi  या संकेतस्थळावर गावनिहाय फेरफार नोटीस व मोजणीची नोटीस पाहायला मिळत आहे . या संकेतस्थळावर गेल्यास सुरुवातीस जमीन मोजणी हा पर्याय निवडावा.  त्यानंतर जिल्हा तालुका व गाव निवडल्यास जमीन मोजणीच्या नोटीस ची माहिती मिळणार आहे.  यामध्ये अर्जदाराने अर्ज कधी केला जमिनीची मोजणीची तारीख कधीची आहे . खातेदार कोण कोण आहेत . मोजणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे नाव इ . माहिती मिळणार आहे. 

Leave a Reply