Lonand onions market price : लोणंदला उन्हाळी कांद्याची मोठी आवक; कसा मिळतोय बाजारभाव..

onions market price

Lonand onions market price : आज शुक्रवार दिनांक २८ फेब्रुवारी आठवड्याच्या शेवटी सकाळच्या सत्रात उन्हाळी कांद्याचे बाजारभाव स्थिर असल्याचे दिसून आले.

लासलगावच्या निफाड बाजारात उन्हाळी कांद्याची सकाळच्या सत्रात सुमारे २०० क्विंटल आवक झाली. कमीत कमी बाजारभाव २१०० रुपये, जास्तीत जास्त २४०० रुपये आणि सरासरी २३०० रुपये प्रति क्विंटल मिळाले.

सातारा जिल्ह्यातील लोणंद बाजारात उन्हाळी कांदयाची सकाळच्या सत्रात सुमारे ७ हजार क्विंटल आवक झाली. या ठिकाणी कमीत कमी ८०० रुपये बाजारभाव मिळाले. जास्तीत जास्त २६०० रुपये बाजारभाव मिळाले, तर सरासरी १८०० रुपये बाजारभाव प्रति क्विंटलसाठी मिळाले आहेत.

दरम्यान राज्यात खेड चाकण बाजारसमितीत सकाळच्या सत्रात लाल कांद्याची १७५ क्विंटल आवक होऊन सरासरी २४०० रुपयांचा दर मिळाला. लासलगावच्या निफाड बाजारात लाल कांद्याची सकाळी ११०० क्विंटल आवक झाली आणि लाल कांद्याला २४२५ रुपये सरासरी बाजारभाव मिळाला.

पुणे बाजारात लाल कांद्याची सुमारे १६ हजार क्विंटल आवक होऊन कमीत कमी १२०० रुपये, जास्तीत जास्त २६०० आणि सरासरी २१०० रुपये बाजारभाव मिळाले. पुणे-मोशी बाजारात सरासरी १५०० रुपये प्रति क्विंटल, पिंपरी बाजारात २१०० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाले. नाशिक जिल्हयातील देवळा बाजारात लाल कांद्याला २२५० रुपये सरासरी बाजारभाव मिळालो.

Leave a Reply