उच्चशिक्षित तरुणाने दीड एकर क्षेत्रामध्ये उभारले लेयर पोल्ट्री फार्म, पोल्ट्री उद्योगातून घेतली भरारी पहा सविस्तर ..

उच्चशिक्षित तरुणाने दीड एकर क्षेत्रामध्ये उभारले लेयर पोल्ट्री फार्म, पोल्ट्री उद्योगातून घेतली भरारी पहा सविस्तर ..

समाजातील ट्रेड पाहिला तर उच्च शिक्षण घेतलेले तरुण चांगल्या पॅकेजची नोकरी शोधतात ,व नोकरी मिळाल्यानंतर यामध्ये सेटल आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतात.  परंतु बरेच तरुण असे असतात की उच्च शिक्षण घेतात.परंतु ते घेतलेल्या शिक्षणाऐवजी दुसरे क्षेत्र निवडून त्यामध्ये यश संपादन करतात

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोरोना काळामध्ये नोकरीपेक्षा व्यवसायाचे महत्त्व अधिक वाढले आहे.त्या कालावधीमध्ये कित्येक लोक बेरोजगार झाले व उदरनिर्वाह करण्याची समस्या देखील त्यांच्यापुढे उद्भवली होती.  अनेकांनी त्यामुळे छोटे-मोठे व्यवसाय सुरू केले.  अशीच परिस्थिती मंदार पेंडणेकर या तरुणांसोबत घडली.  फायनान्स मध्ये एमबीए पूर्ण केलेल्या मंदार पेडणेकर या तरुणाची नोकरी कोरोना काळामध्ये गेली.  त्यामुळे त्यांनी त्यांच्या राहत्या गावात पोल्ट्री फार्म सुरू करण्याचे निर्णय घेतला.

लेअर पोल्ट्री फार्मिंग मध्ये रोवले पाय.. 

मंदार पेंडणेकर या तरुणाने संपूर्ण शिक्षण मुंबईत घेतले, व तिथेच ते लहानाचे मोठे देखील मुंबईमध्ये झाले . फायनान्स मध्ये एमबीए पूर्ण केले परंतु इतके शिक्षण घेऊन देखील या तरुणांनी व्यवसाय करण्याचे ठरवले यासाठी ते त्यांच्या कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेल्या चिंचोली या गावी आले, व लेयर पोल्ट्री फार्म सुरू करण्याचे निश्चित केले दीड एकर क्षेत्रामध्ये हा पोल्ट्री फार्म उभारायचे निश्चित केले . 

सध्या त्यांच्या पोएट्री शेडमध्ये दहा हजार कोंबड्या असून दररोज नऊ हजार पेक्षा जास्त अंडी उत्पादन त्यांना या माध्यमातून मिळत असते त्यांना त्यांनी उत्पादनाच्या माध्यमातून प्रति महिना एक लाख वीस हजार च्या आसपास नफा मिळत आहे

अशा पद्धतीने केले गुंतवणुकीसाठी पैशाचे नियोजन.

त्यांना हा प्रकल्प उभारण्यासाठी साधारणपणे 60 ते 65 लाख रुपये खर्च आला आहे . केंद्र सरकार मध्ये त्यांचे वडील सेवेत होते.  ते सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांना जे काही सेवानिवृत्तीचे रक्कम मिळाली.  त्या रकमेतून त्यांनी हा प्रकल्प उभा केला.  ते  आवर्जून सांगतात की वडिलांचे पुण्याईमुळे मी हा व्यवसाय सुरू करू शकलो.

खाद्य विकत घेण्यापेक्षा स्वतः तयार करण्यावर भर.

जर पोल्ट्री उद्योगाचा विचार करत असाल तर सगळ्यात जास्त पैसा हा खाद्यावर खर्च होत असतो . हीच बाब डोळ्यासमोर ठेवून मंदार पेडणेकर त्यांच्या पोल्ट्री फार्म मधील कोंबड्या करता लागणारे खाद्य हे ते स्वतः तयार करतात.  हे खाद्य तयार करण्यासाठी त्यांना स्टोन ग्रीड ,सोयाबीनचे पेंट, तसेच काही औषधी घटक त्यामध्ये मिक्स करतात व काही आवश्यक कच्चे खाद्य बाहेरून मागवले जाते.

त्यामुळे खाद्यावरील बराच खर्च कमी होण्यास मदत होते.  त्यामुळे नफा वाढत जातो.  अशा पद्धतीने जर व्यवसायामध्ये व्यवस्थित अभ्यास करून आणि जिद्द ठेवून जर व्यवसाय सुरू केला . तर नक्कीच यश मिळते.  हे मंदार पेडणेकर यांच्या उदाहरणावरून दिसून येते. 

Leave a Reply