कृषी विभागामार्फत खरीप हंगाम 2023 साठी महाडीबीटी पोर्टल द्वारे खरीप पिकांचे बियाणे वितरण करण्याचे अर्ज मागविले जात आहेत . खरीप पिकांचे अनुदानावरती प्रात्यक्षिक अंतर्गत बियाणे वितरण या साठी सध्या महाडीबीटी पोर्टल अर्ज सुरू आहे.
जे शेतकरी इच्छुक आहेत त्यांनी महाडीबीटी पोर्टल वर बियाणे या घटकांतर्गत पीक प्रात्यक्षिक व प्रमाणित बियाणे वितरण यासाठी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरू शकता .मूग , उडीद , तूर ,सोयाबीन, मका , इत्यादी पिकांच्या बियाणांसाठी महाडीबीटी पोर्टल वर अर्ज करू शकता.
२५ मे ही अर्ज सादर करण्याची शेवट ची तारीख आहे. तरी इच्छुक शेतकऱ्यांनी लवकरात लवकर अर्ज सादर करावा . २५ तारखेनंतर अनुदानित बियाणे वितरण साठी सादर झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही , याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी. शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर महाडीबीटी पोर्टलवर बियाणे अनुदान साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत .
अर्ज करण्यासाठी खालील वेबसाईडवर क्लिक करा.
https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/login/login
महाडीबीटी पोर्टल वर अर्ज करण्याची पद्धती
१) सर्वात प्रथम महाडीबीटी पोर्टलवर लॉगिन करा.
२) तिथे तुम्हाला अर्ज करा असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
३) नंतर बियाणे औषधे व खते हा पर्याय निवडावा .
४) आपल्या तालुक्याचे नाव , आपल्या गावाचे नाव , गट क्रमांक हे ऑपशन निवडावा.
५) अनुदान हवे असलेली बाब निवडावी प्रमाणित बियाणे वितरण किंवा पीक प्रात्यक्षिक निवडावी.
६) आपल्याला ज्या पिकावर अनुदान हवे ते पिक निवडावे.
७) त्यानंतर पिकाचे वाण निवडावे.
८) लाभ घेण्याचे क्षेत्र निवडावे
९) अर्ज जतन या ऑपशन क्लिक करा .
१०) यानंतर मुख्य पृष्ठ वरती यावे
११) आता तुम्हाला अर्ज सादर करा हा पर्याय निवडायचा आहे .
१२) यानंतर प्राधान्यक्रम देऊन अर्ज सादर करा या बटणावर क्लिक करून अर्ज सादर करावा.