हवामान अंदाजानुसार उद्या 23 जून राज्यातल्या काही भागांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे.कोकण ,मध्य महाराष्ट्र, आणि विदर्भात याठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
राज्यातील वातावरणामध्ये सतत बदल होत आहे काही भागांमध्ये उन्हाचा तडाखा जाणवत आहे तर काही भागांमध्ये ढगाळ वातावरण आहे याच दरम्यान हवामान विभागाने माहिती दिल्यानुसार 23 जून राज्यातील काही भागांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे.
कोकण मधील काही भागांमध्ये तसेच मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ येथे पावसाची शक्यता आहे 24 व 25 जून पासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे तसेच मराठवाडा मधील काही भागात मेघ गर्जना सह पावसाची शक्यता आहे .मोसमी पाऊस लांबल्यामुळे खरीप हंगाम अडचणीत आला असल्याचे चित्र आहे.
शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसला आहे काही भागांमध्ये शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे सावट निर्माण झाले आहे जून महिना लागताच शेतकरी बी- बियाणे यांनी खरेदी सुरू करतात यावेळी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी बी- बियाणे खरेदी केली आहे.