महिला बचत गटांसाठी मिळणार या योजनेतून चार टक्के दराने व्याज, जाणून घ्या कोणती आहे ही योजना?

महिला बचत गटांसाठी केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागामार्फत ‘ महिला समृद्धी कर्ज योजना या योजने मधून महिलांना उद्योगासाठी कर्ज दिले जाते त्या कर्जाच्या रकमेवर फक्त चार टक्के दराने व्याज घेतले जाते. महिलांना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी चार टक्के व्याजदराने ५ लाख ते २० लाखांपर्यंत कर्ज महिला समृद्धी कर्ज योजनेंतर्गत उपलब्ध करून दिले जाते .

तसेच महिला या पुरुषांच्या तुलनेत जास्त काटकसरी असतात. महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून थाटलेले उद्योग कमी कालावधीच भरभराटीस आले आहेत. त्यामुळेच सरकारने महिला समृद्धी कर्ज योजना अमलात आली असून या योजनेचा विशेष लाभ बचत गटात असलेल्या महिलांना मिळत आहे. या योजनेच्या माध्यमातून अल्पसंख्याक समाजातील महिलांना उद्योग सुरू करण्यासाठी प्रवृत्त करून या योजनेअतर्गत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. यामाध्यमातून त्यांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्धव्हावी यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. महिलांना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी चार टक्के व्याजदराने पाच लाख ते वीस लाखांपर्यंतचे कर्ज महिला समृद्धी कर्ज या योजने अंतर्गत उपलब्ध करून दिले जात आहे.

हि योजना आहे तरी काय ?

महाराष्ट्र सरकार द्वारे महिला बचत गट शासकीय योजना सुरु केली आहे. महिला समृद्धी कर्ज योजना एक अत्यंत महत्वाची अशी एक योजना आहे जी महाराष्ट्र शासनाद्वारे सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिला स्वतःचा एखादा लहान उद्योग सुरु करू शकता . तसेच स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी पाच लाख ते वीस लाखांपर्यंत कर्ज या योजना अंतर्गत महिला बचत गटाला उपलब्ध करून दिले जाते. महिलांना खूप कमी व्याज दरात म्हणजेच 4% व्याज दराने सरकार कर्ज उपलब्ध करून देत आहे. या योजनेमध्ये मिळालेले कर्ज परत फेड कारणांचा कालावधी 3 वर्षाचा ठेवण्यात आला आहे.

लाभ घेण्यासाठी निकष काय ?

मागासवर्गीय ,अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थी हा असायला हवा. बचत गट व मागासवर्गीय घटकातील महिला उद्योजक या योजनेंतर्गत कर्ज घेऊ शकतात . १८ ते ५० वर्षे लाभार्थीचे वय असायला पाहिजे . महिला समृद्धी कर्ज योजनेचा लाभ आतापर्यंत अकोला जिल्ह्यातील ५० पेक्षा जास्त महिलांना देण्यात आला आहे.या योजनेची जिल्ह्यात अंमलबजावणी सुरू झाली आहे. या योजनेंतर्गत कर्ज मिळविण्यासाठी महिलांनी रीतसरपणे अर्ज करावा .

कोणती आवश्यक कागदपत्रे

◼️ रेशन कार्ड,
◼️ आधार कार्ड,
◼️ बँकेचा तपशील, पासपोर्ट साईज फोटो,
◼️ रहिवाशी पुरावा,
◼️ उत्पन्नाचा दाखला
◼️ मोबाईल नंबर, ई-मेल आयडी,
◼️ व्यवसाय प्रकल्पाच्या खर्चाचा अंदाजपत्रक इत्यादी.

Leave a Reply