रेशन कार्ड आधार कार्डाशी लिंक करणे बंधनकारक ,या तारखेपर्यंत करू शकता आधारकार्ड लिंक ..

स्वस्त धान्य दुकानातून रेशन घेणाऱ्या लाभार्त्याना रेशन कार्ड आधार कार्डाशी लिंक करणे बंधनकारक केले आहे. लाभार्थ्यांनी येत्या ३१ ऑक्टोबरपर्यंत आधार जोडणी करून घ्यावी . यानंतर ज्या लाभार्थ्यांचे रेशन कार्ड अशी आधार जोडणी नसेल त्यांचे रेशन बंद करण्याच्या सुचना दिल्या आहेत. यामुळे लाभार्थ्यांनी स्वस्त धान्य दुकानामध्ये जाऊन आधार जोडणी करून घ्यावी असे, आवाहन पुरवठा अधिकारी सविता चौधरी यांनी केले आहे.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत तांदळासह धान्य वाटप करण्यात येते. आता सरकारने या योजनेचा लाभ घेणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना ई केवायसी करण्यासाठी सांगितले आहे.ज्या लोकांनी आधार लिंक केले नसेल , अशा लाभार्थ्यांचे रेशन कार्ड बंद केले जाणार आहे. बनावट लाभार्थी धान्याचा लाभ घेत असल्याचे राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत उघड झाले आहे. या लाभार्थ्यांचे रेशन बंद करण्यासाठी सरकारने आधार लिंक करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

३१ ऑक्टोबरपर्यंत केशरी आणि पिवळ्या रेशन कार्डधारकांना रेशन कार्डशी आधार लिंक करणे आवश्यक आहे. जुन महिन्यात आधार लिंक करण्यासाठी पुरवठा खात्याकडून विशेष मोहीम सुरू केली आहे , परंतु, पावसाचे पाणी पुरवठा विभागाच्या डेटा सेंटरमध्ये घुसल्यामुळे आधार लिंक करणे शक्य झाले नाही.

रेशन कार्ड होणार बंद
बोगस रेशनकार्ड धारकांचा शोध अन्न सुरक्षा योजनेत घेण्यासाठी आधार लिंक करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. रेशन कार्डाशी बायोमेट्रिक पडताळणी झाली नसेल तर अशा लाभार्थ्यांचे रेशन आधार लिंक करून घ्यावे . वरिष्ठ कार्यालयाकडून आलेल्या सुचनेनुसार, येत्या ३१ ऑक्टोबरपर्यंत शिधापत्रिकेशी आधार लिंक करण्याची मुदत देण्यात आलेली आहे. स्वस्त धान्य दुकानात ई-पॉस यंत्राद्वारे लाभार्थ्यांनी आधार लिंक करून घ्यावे.
– सविता चौधर, जिल्हा पुरवठा अधिकारी, जालना

४० हजार ८५५ लाभार्थ्यांचे आधार लिंकची प्रक्रिया पूर्ण ..

पुरवठा विभागाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यात रेशनचे धान्य घेणारे १५ लाख ५५ हजार ९२४ लाभार्थी आहेत. या लाभार्थीपैकी ४० हजार ८५५ लाभार्थ्यांचे आधार लिंकची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे.

ज्यांचे आधारकार्ड लिंक नाही त्यांचे रेशन कार्ड बंद करण्यात येणार आहेत. यामुळे रेशन कार्ड असेल तरी धान्य मिळणार नाही त्यामुळे लाभार्थ्यांनी शिधापत्रिका आधार लिंक करून घ्यावी, असे आवाहन केले जात आहे .

ई-केवायसी करणे का बंधनकारक .

• आपल्या उपजीविका भागवण्यासाठी अनेक मजूर कामाला जातात अशा लाभार्थ्यांना रेशन मिळणे कठीण होते. रेशन कार्ड केवायसी नाही, , मजुरांच्या बोटांचे ठसे लागत नाही किंवा असे कारण सांगून स्वस्त धान्य दुकानदार रेशनच देत नाही.

• लाभार्थ्यांना या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी आधार लिंक करण्याची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. रेशन दुकानातील ई-पॉस यंत्रावर बोटाचे ठसे किंवा डोळे स्कॅन केल्यानंतर आधार जोडणीची प्रक्रिया पूर्ण करता येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *